चाकूहल्ल्यात विक्रेता जखमी
सिडको : प्रतिनिधी
म्हसरूळ परिसरातील मेहेरधाम बसथांब्याजवळ फळविक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दोघांनी संगनमत करून एका विक्रेत्याकडून तब्बल 35 हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच हप्त्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने विक्रेत्यावर चाकूने वार करून त्याच्याकडील 8 हजार 900 रुपये जबरदस्तीने लुटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खंडणी, जबरी चोरी आणि मारहाणीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विजय बाळू माने (वय 38, रा. तेलंगवाडी, पेठरोड) हे फळविक्रीचा व्यवसाय करतात. फेब्रुवारी 2026 ते 8 नोव्हेंबर 2026 या कालावधीत संशयित गजू घोडके आणि त्याच्या आदी नावाच्या साथीदाराने संगनमत करून माने यांना घातक शस्त्राचा धाक दाखविला. तसेच जिवे मारण्याची धमकी देत व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी 35 हजार रुपये खंडणी स्वरूपात वसूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, माने यांनी हप्ता देण्यास टाळाटाळ केल्याने संशयितांनी त्यांच्या फळविक्रीच्या गाड्यावर जाऊन चाकूचा धाक दाखविला. यावेळी माने यांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर खिशातील आणि गल्ल्यातील असे एकूण 8 हजार 900 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गवारे आणि महिला उपनिरीक्षक तुरे पुढील तपास करीत आहेत.
Extortion money demanded to allow the fruit-selling cart to continue operating
पूवर्र्वैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचवटी : प्रतिनिधी शहरातील पंचवटी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा डोके…
सर्व मंत्र्यांसोबत साडेतीन तास मंथनानंतर मोदी-शहा-नितीन नवीन यांच्यात दीड तास बैठक नवी दिल्ली । प्रतिनिधी…
रुग्णालयातून परतणार्या सहकार्यांचाही अपघात नांदगाव : प्रतिनिधी वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी येणार्या प्राध्यापकाचा हृदयविकारा-च्या तीव्र…
चार लाख भाविकांची मांदियाळी; उपमुख्यमंत्री शिंदे करणार महापूजा सोलापूर : सूर्यकांत आसबे दक्षिण काशी म्हणून…
फिक्कीतील भाषणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याचे वृत्त; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कारवाई; पक्षशिस्तभंगाचा ठपका नाशिक :…