रुग्णालयातून परतणार्या सहकार्यांचाही अपघात
नांदगाव : प्रतिनिधी
वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी येणार्या प्राध्यापकाचा हृदयविकारा-च्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी घडली. या घटनेनंतर मालेगावहून परतताना इतर तीन प्राध्यापकांच्या वाहनाचा अपघात होऊन ते जखमी झाल्याची दुहेरी धक्कादायक घटना समोर आली आहे. या सलग घडलेल्या घटनांमुळे नांदगाव तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील श्री साई शिक्षण संस्था संचलित कै. वा. सो. पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेजचे प्रा. आबासाहेब हिंमतराव शिरसाठ (वय 48) हे गेल्या सात दिवसांपासून साकोरा येथे सुरू असलेल्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी येत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी येत असताना तळवाडे गावाजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सहकारी शिक्षकांनी त्यांना तातडीने चारचाकी वाहनातून उपचारासाठी मालेगाव येथे हलवले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शिरसाठ यांच्या निधनानंतर त्याच चारचाकी वाहनातून परतणार्या इतर तीन शिक्षकांचा जाटपाडे शिवारात अपघात झाला. या अपघातात अमोल गंगेले (वय 44), नितीन अहिरे (वय 38) आणि तुषार मेतकर (वय 38) हे तिघे शिक्षक जखमी झाले असून, त्यांच्यावर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रा. आबासाहेब शिरसाठ यांची 2023 मध्ये श्री साई शिक्षण संस्था संचलित (कै.) वामन सोनोजी पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर चाळीसगाव येथे शनिवारी (दि. 20) सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आकस्मित निधनामुळे साकोरा येथील प्रशिक्षणार्थी शिक्षक आणि आमोदे परिसरात शोककळा पसरली आहे.
Professor dies of a heart attack while on his way to training
चाकूहल्ल्यात विक्रेता जखमी सिडको : प्रतिनिधी म्हसरूळ परिसरातील मेहेरधाम बसथांब्याजवळ फळविक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दोघांनी…
पूवर्र्वैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचवटी : प्रतिनिधी शहरातील पंचवटी परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा डोके…
सर्व मंत्र्यांसोबत साडेतीन तास मंथनानंतर मोदी-शहा-नितीन नवीन यांच्यात दीड तास बैठक नवी दिल्ली । प्रतिनिधी…
चार लाख भाविकांची मांदियाळी; उपमुख्यमंत्री शिंदे करणार महापूजा सोलापूर : सूर्यकांत आसबे दक्षिण काशी म्हणून…
फिक्कीतील भाषणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल नवी दिल्ली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याचे वृत्त; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कारवाई; पक्षशिस्तभंगाचा ठपका नाशिक :…