नाशिक

चांदवडचे शेतकरी पुन्हा उपोषणाच्या तयारीत

‘ट्रिगर-1’ दुष्काळी यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड : वार्ताहर
दुष्काळाच्या निकषांमध्ये चांदवड तालुक्याचा समावेश करून ‘ट्रिगर-1’ अंतर्गत सर्व आवश्यक दुष्काळी सवलती तत्काळ लागू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी चांदवड तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला सध्या स्थगिती मिळाली आहे. प्रशासनाने शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे व योग्य तो निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर, आंदोलनावर बसलेल्या सहा शेतकर्‍यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.
प्रशासनाने दिलेल्या मुदतीत म्हणजेच 13 ऑक्टोबरपर्यंत कोणताही ठोस निर्णय न झाल्यास, आगामी 14 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू करण्याचा सज्जड इशारा आंदोलक शेतकर्‍यांनी दिला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनने पाठ फिरवल्याने आणि अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने चांदवड तालुक्यातील खरिपाच्या पिकांवर अतिशय वाईट परिणाम झाला आहे. ऐन वाढीच्या काळात पाणी न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांची पिके करपून गेली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यात तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा येथील शेतकरीवर्ग करत आहे.
शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळी यादीत चांदवड तालुक्याचा समावेश न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकरी नेते संपतबाबा वक्टे, संजय गुंजाळ, अनिल गुंजाळ, संदीप चव्हाण, कैलास जाधव आणि दत्तू ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 29) अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत बुधवारी नायब तहसीलदार राहुल निकम, तालुका कृषी अधिकारी नीलेश मावळे तसेच पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी उपोषणकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी उपोषणकर्त्या शेतकर्‍यांनी मागण्यांचे गांभीर्य प्रशासनासमोर मांडले. त्यानंतर तहसीलदार अनिल चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांना प्रशासकीय पातळीवर लेखी पत्र सुपूर्द केले. या पत्रात आंदोलनकर्त्यांचे सर्वंकष निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे पाठविले आहे. या मागणीवरील पुढील सर्व कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही शासनस्तरावर केली जाईल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

13 ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची प्रतीक्षा

प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर शेतकर्‍यांनी अन्नत्याग उपोषण सध्यातरी तात्पुरते स्थगित केले आहे. परंतु केवळ कागदी आश्वासनांवर न थांबता शासनाने 13 ऑक्टोबरपर्यंत चांदवड तालुक्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. जर ठरवून दिलेल्या मुदतीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, तर येत्या 14 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचे बेमुदत उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Farmers from Chandwad preparing for a hunger strike again.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago