नाशिक

बोलठाण येथे एका रात्रीत 5 ते 7 घरफोड्या

परिसरात भीतीचे वातावरण

बोलठाण : प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करत 5 ते 7 ठिकाणी चोरी केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, बोलठाण व नवेगाव परिसरातील सुमारे 5 ते 7 घरांमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने लंपास केले. चोरी झालेल्या घरमालकांकडून ही माहिती समोर आली आहे. चोरीचा नेमका आकडा व मालमत्तेचे नुकसान याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. बोलठाण परिसरात यापूर्वीही अनेक घरफोड्या व चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्यांपैकी अनेक घटनांचा उलगडा अद्याप झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे या नव्या घरफोड्यांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार भास्कर बस्ते व पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची माहिती व गांभीर्य लक्षात घेत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळशे यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ तपासासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञ पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, एका रात्रीत झालेल्या या सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोळशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर बस्ते करत आहेत. बोलठाण येथे शनिवारी मध्यरात्री झालेल्या धाडसी घरफोड्यांमध्ये बापू ढगे, कल्पना ढगे, तात्याराव चव्हाण, गणेश शितोळे व सुनील चव्हाण यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. तसेच नितीन कायस्थ, नारायण कासलीवाल व राजेंद्र डोंगरे यांच्या घरांच्या कड्याही तोडण्यात आल्या. मात्र, गल्लीतील नागरिकांना जाग आल्याने चोरट्यांचा पुढील डाव फसला. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोलठाण येथील गेटचे कुलूप तोडून त्याच मार्गाने पळ काढला.
विशेष बाब म्हणजे, उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबीय घराच्या टेरेसवर झोपलेले असतानाच त्यांच्या घरांमध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे.

5 to 7 burglaries in a single night at Bolthan.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago