नाशिक

शेतपंप, ट्रॅक्टर ट्रॉली व बुलेट चोरी करणारी टोळी जेरबंद

तीन लाख 17 हजारांंचा मुद्देमाल जप्त; सिन्नर पोलिसांची कामगिरी

सिन्नर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या विहिरीवरील शेतपंप, ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटारसायकल चोरी करून शेतकर्‍यांना अक्षरशः हैराण करणार्‍या टोळीचा अखेर सिन्नर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सिन्नर बसस्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी तिघांना जेरबंद केले आहे. तीन जण फरार आहेत. अटक आरोपींकडून तीन लाख 17 हजारांंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात 24 जानेवारी 2026 रोजी भा.दं.वि. कलम 303 (2), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात विहिरी व नदीकाठावरील शेतपंपांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी जाण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना गुप्त माहिती मिळाली की शेतपंप चोरी करणारे संशयित रात्रीच्या सुमारास सिन्नर बसस्थानक परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे गुन्हेशोध पथकाने परिसरात सापळा रचून संशयित तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये नीलेश दत्तू सोनवणे (वय 34, रा. ब्राह्मणवाडे, ता. निफाड), रवींद्र प्रभाकर धोकरट (27, रा. सोमठाणे, ता. सिन्नर) आणि राहुल विलास गायकवाड (26, रा. सोमठाणे, ता. सिन्नर) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील भारत बाळासाहेब जगताप (रा. खनगाव थडी, ता. निफाड), श्रावण सुरेश पिंपळे (रा. नैताळे, ता. निफाड) आणि शोएब शेख (रा. तासदिंडोरी, ता. निफाड) हे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे सिन्नर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 50/2026 तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 114/2026 उघडकीस आला आहे. फरार आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत चोरी व दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस अंमलदार समाधान बोराडे, नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड आणि प्रशांत सहाणे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस नाईक दिनकर पारधी करीत आहेत.

सिन्नर, कोपरगाव, निफाड तालुक्यात चोर्‍या

चौकशीदरम्यान सराईत चोरट्यांनी सिन्नर, बेलू व लासलगाव परिसरात रात्रीच्या वेळी शेतपंप चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या साथीदारांनी निफाड परिसरातून ट्रॅक्टर ट्रॉली व कोपरगाव येथून रॉयल एनफिल्ड कंपनीची क्लासिक 350 बुलेट मोटारसायकल चोरी करून ती कमी किमतीत विक्रीसाठी दिल्याचेही उघड झाले. अटक आरोपींकडून एक लाख रुपये किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली, 12 हजार रुपयांच्या दोन पाणबुडी शेतपंप मोटारी, दोन लाख रुपयांची रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बुलेट मोटारसायकल तसेच पाच हजार रुपये रोख, असा एकूण तीन लाख 17 हजारांंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Gang of farm pump, tractor trolley and bullet thieves arrested

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago