नाशिक

समृद्धी महामार्गावर दारू तस्करीचा पर्दाफाश

आयशर ट्रकमधील चोरकप्प्यातून गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त; 24.18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सिन्नर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरून चोरट्या मार्गाने गोवा बनावटीची विदेशी दारू महाराष्ट्रात आणण्याचा प्रकार सिन्नर पोलिसांनी उधळून लावला. आयशर ट्रकमधील गुप्त चोर कप्प्यात लपवून दारूची तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. दारूचे बॉक्स आणि वाहनासह तब्बल 24 लाख 18 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातून अवैध दारू तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी चालक अंकित सुरेश पारिख (वय 27, रा. कोलसिया, ता. नवलगढ, जि. झुंझुनू, राजस्थान) व त्याचा साथीदार मुरारीलाल मधनलाल पारिख (35, रा. जयपूर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त मालामध्ये सुमारे 4 लाख 18 हजार 760 रुपयांची विदेशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण 24 लाख 18 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्च 2026 रोजी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, समृद्धी महामार्गावरून गोवा बनावटीची विदेशी दारू चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाणार आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकाला तत्काळ रवाना करण्यात आले.
पथकाने शिवडे शिवारातील समृद्धी महामार्गावर सापळा रचला. दरम्यान, मुंबईकडून सिन्नरच्या दिशेने येणार्‍या (एमएच 48 सी क्यू 5692) क्रमांकाच्या आयशर ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 583.5 येथे वाहन अडवण्यात यश मिळवले. वाहनाची झडती घेतली असता ट्रकच्या मागील केबिनमध्ये प्लायवुड व नटबोल्ट लावून तयार केलेला गुप्त चोर कप्पा आढळून आला. या कप्प्यातून गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याचे 88 बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) (ई) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही दारू कोणाच्या सांगण्यावरून व कुठे पोहोचवण्यासाठी नेली जात होती, तसेच या तस्करीत आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड व प्रशांत सहाणे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल शिंदे करीत आहेत.

Liquor smuggling busted on Samruddhi Highway

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago