नाशिक

गोकुळ गितेंच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत ट्विस्ट

मंत्री सामंत यांची मध्यस्थी निष्फळ, शिंदेसेनेला धक्का

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या शिंदेसेनेच्या प्रयत्नांना गुरुवारी (दि.4) जोरदार धक्का बसला. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज अखेरपर्यंत कायम ठेवल्याने माजी आ. नरेंद्र दराडे यांच्यासमोर आता गिते यांच्यारूपाने तगडे आव्हान उभे राहिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत बुधवारीच गिते बंधूंच्या माघारीसाठी नाशकात आले होते. मात्र, गोकुळ गिते यांची माघार न होऊ शकल्याने शिंदेसेनेला धक्का बसला आहे. यानिमित्ताने मात्र नाशिक विधान परिषद निवडणुकीत चांगलाच ट्विस्ट आला आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होताच प्रारंभीपासून या जागेवर भाजपने दावा केला. माजी स्थायी सभापती गणेश गिते यांनी त्याद़ृष्टीने तयारीदेखील सुरू केली होती. भाजपने जोरदारपणे नाशिकवर दावा केल्याने शिंदेसेनेत धाकधूक वाढली होती. मात्र, अखेरच्या क्षणी महायुतीच्या जागावाटपात शिंदेसेनेने नाशिकची जागा पदरात पाडून घेतली व पुन्हा नरेंद्र दराडे यांनाच येथून उमेदवारी दिली. दराडे यांच्या घरात पुन्हा उमेदवारी नको, यावरून पक्षांतर्गतच काहींचा विरोध होता. त्यांचे बंधू आमदार असताना दुसर्‍यांना संधी मिळावी, याकरिता पक्षातील पदाधिकारी इच्छुक होते. पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र दराडे यांना शब्द दिल्याने पुन्हा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. दराडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावेळी पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी व आमदार व संपर्कप्रमुख सुहास कांदे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. नाराजीमुळे संबंधितांनी उपस्थित राहणे टाळले. अशाही नंतर चर्चा सुरू झाल्या. मात्र, आ. कांदे यांनी नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर असल्याचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहता आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. असे असले तरी नाशिक विधान परिषदेसाठी भाऊसाहेब चौधरींबरोबरच आ. कांदे हे त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्यासाठी आग्रही होते. दरम्यान, गुरुवारी माघारीनंतर चित्र स्पष्ट झाल्याने दराडे व गिते दोन्ही कामाला लागले आहेत. यांना स्वपक्षाबरोबरच भाजप, राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील मतदार सांभाळावे लागतील. विशेषत: नगरपालिका निवडणुकीत ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याशी नगरपालिका निवडणुकीत झालेला संघर्ष, संपूर्ण जिल्ह्याने पाहिला आहे. यास दराडे कसे सामोरे जाणार, तेही पहावे लागणार आहे.

गोकुळ गिते यांची बलस्थाने
नाशिक महापालिकेतील नगरसेवकांसह जिल्ह्यातील सर्व पक्षांतील मतदारांशी चांगले संबंध
अर्ज भरल्यानंतर माघार घेऊ नका, नाशिकसह जिल्ह्यातील नगरसेवकांचे स्वत:हून फोन
कमकुवत बाजू – निवडणूक लढवताना पक्षाची ताकद नाही.

माजी आ. नरेंद्र दराडेंची बलस्थाने
महायुतीचे उमेदवार असल्याचा फायदा
शहर-जिल्ह्यातील पक्षनेत्यांची फौज
कमकुवत बाजू- आमदार झाल्यानंतर मतदारांशी तुटलेला संवाद, पक्षांतर्गत नाराजी

 

Gokul Geete’s candidature causes a twist in the election

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

9 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago