नाशिक

सिंहस्थामुळे त्र्यंबकरोड होणार हरित

जागतिक पर्यावरण दिन : बेल उद्यान जागेअभावी बारगळले

नाशिक  : देवयानी सोनार
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एप्रिल 2023 मध्ये राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी पंचायतन, अमृत आणि बेल वनोद्यानाची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेला तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही राज्यातील अनेक जिल्ह्यांत अणि शहरांत, धार्मिक स्थळांवर ही उद्याने प्रत्यक्षात साकारलेली नाहीत. बागलाणचा अपवाद वगळता त्र्यंबकेश्वर येथे बेलवन करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, जागा न मिळाल्याने हे बेलवन प्रत्यक्षात साकार होऊ शकले नाही.

नेमकी योजना काय आहे?
पंचायतन वनोद्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 25 गावांत वड, उंबर, पिंपळ, बेल आणि देशी आंबा लावून ती उद्याने उभारण्याचे उद्दिष्ट होते.
अमृत वनोद्यान प्रदूषण रोखण्यासाठी आणि तापमानातील वाढ कमी करण्यासाठी राज्यातील 75 शहरांत औषधी व दुर्मिळ वनस्पतींची लागवड करायची होती.
बेल वनोद्यान सद्यःस्थितीतील असुरक्षित असलेल्या बेलाचे संवर्धन करण्यासाठी राज्यातील 75 धार्मिक व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ही वने साकारण्यात येणार होती. मात्र, काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नेमके घोडे अडले कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. 13 एप्रिल 2023 रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयाने अत्यंत तातडीचे पत्र काढून सर्व अधिकार्‍यांना 17 एप्रिल 2023 पर्यंत उद्यानांसाठी जागांची निवड करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शासन निर्णयानुसार या उद्यानांच्या पूर्वतयारीची आणि लागवडीची कामे सन 2023-24 याच वर्षात पूर्ण करणे बंधनकारक होते.
या योजनेचा कालावधी पुढील सात वर्षे म्हणजेच सन 2023-24 ते 2029-30 असा निश्चित करण्यात आला होता. उद्याने उभारणी आणि त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागावर सोपवण्यात आली होती. मात्र, लागवडीच्या वर्षातच जर कामे झाली नसतील तर पुढील सात वर्षे देखभाल कसली आणि कोणत्या झाडांची केली जाणार, असा प्रश्न निर्माण
झाला आहे.

निधी गेला कुठे?
या उद्यानांसाठी शासकीय तिजोरीतून निधीची तरतूद करण्यात आली होती, तसेच व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) व अशासकीय संस्थांच्या मदतीने खर्च करण्याचे आदेश होते. जर उद्याने उभी राहिलीच नाहीत तर हा मंजूर झालेला निधी नक्की गेला कुठे? जागांचे काय झाले? वन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या उद्यानांसाठी 0.5 ते 5 हेक्टरपर्यंतच्या जमिनी निवडायच्या होत्या. ही जागानिश्चिती प्रक्रिया पूर्ण झाली आहे का? याबाबत शासन पातळीवर सध्या तरी उत्तरे देण्याऐवजी टोलवाटोलवी केली जात आहे.

बेलवन प्रस्तावित नाही
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंंगाने स्थानिक प्रजाती जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध नाही. परिणामी, शेतकर्‍यांना प्रोत्साहित करून रस्त्यांच्या कडेने रोपे लावणार आहे. नरेंद्रनाथ महाराजांनी गेल्या वेळी दहा हजार रोपांची लागवड केली होती. तसे अनेक जण भाग घेणार आहेत. स्थानिक ग्रामस्थ, शासकीय-निमशासकीय संस्था, देवस्थाने आणि आखाडे यांच्या सहभागाने वड, उंबर, कवठ, पिंपळ, प्रामुख्याने बेल, रुद्राक्ष या झाडांची रोपे लोकसहभागातून करण्याचा मानस आहे. रिंगरोड व इतर रस्त्यांच्या कडेला संबंधित एजन्सीलाही रोपे लावण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. सध्या तरी बेलवन प्रस्तावित नाही.
– गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, वन्यजीव विभाग

बेलवनासाठी त्र्यंबकेश्वर योग्य
अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक या पाच जिल्ह्यांत बेल वनोद्यान साकारण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असल्याने धार्मिक महत्त्व अधिक आहे. बेल वनोद्यान निर्मितीचा शासन आदेश 13 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार त्र्यंबकेश्वरला बेल वनोद्यान पुढील वर्षापर्यंत साकारले जाण्याची शक्यता होती; परंतु जागाच मिळाली नाही. त्यासाठी जागेचा शोध घेण्यास सांगितले होते. परंतु, जागाच न मिळाल्याने हे बेलवन प्रत्यक्षात साकार होऊ शकले नाही.

विभागनिहाय बेलवन आणि कंसात लावलेली रोपे
नाशिक : 01                             दोधेश्वर (200)
अहिल्यानगर : 03                   पारनेर (400),     कोपरगाव (160),
नेवासा (160)
धुळे : 02                                  साक्री (400),      शिरपूर (400)
जळगाव : 02                           एरंडोल (400),     भुसावळ (400)
नंदुरबार : 02                           नंदुरबार (800),  चिंचपाडा (800)

Trimbak Road will be green due to Simhastha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

19 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

19 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

20 hours ago