नाशिक

8 जूनपर्यंत निर्णायक बैठक घ्या, अन्यथा भाजप कार्यालयाला घेराव

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
रिंगरोडबाधित शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पाथर्डी येथील कृष्ण संगिनी हॉटेलमध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार सरोज अहिरे, नगरसेवक भगवान दोंदे व 25 गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत रिंगरोड प्रकल्पासंदर्भातील तक्रारी, कलम 19 व 21 अंतर्गत नोटिसा तसेच नवीन अलाइनमेंटबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. काही एमएसआरडीसी अधिकार्‍यांकडून वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी शेतकर्‍यांनी व्यक्त केली.
आमदार सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शेतकर्‍यांची भूमिका मांडण्यासाठी वेळ मागितल्याचे सांगितले. तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून लवकरात लवकर निर्णायक बैठक घेण्याची मागणी केली.
बैठकीत सर्वानुमते ठराव करून 8 जूनपर्यंत गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी व शेतकरी यांची अंतिम बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीत शेतकरी हिताचा ठोस निर्णय न झाल्यास नाशिक शहरातील भाजप कार्यालयाला हजारो शेतकरी घेराव घालतील, असा इशारा करण गायकर यांनी दिला.
शासनाने वेळकाढूपणा न करता तातडीने निर्णय घेऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाची जबाबदारी प्रशासन व संबंधित यंत्रणांवर राहील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी बैठकीस देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोजताई अहिरे, भाजपचे नगरसेवक भगवान दोंदे, सामाजिक कार्यकर्ते मदन ढेमसे, दीपक हगवणे, सुदर्शन पाटील, त्र्यंबक कोंबडे, सोमनाथ बोराडे, सुभाष गायकर, उत्तम जाधव, पुंडलिक जाधव यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींमध्ये सुदाम जाचक, सागर लोणे, तुषार कोंबडे, गोकुळ बोराडे, धनाजी जाधव, उत्तम जाधव, तानाजी जाधव, भास्कर चुंबळे, दौलत चुंबळे, संजय हंडोरे, मनीष हांडोरे, मधुकर पोरजे, अविनाश पोरजे, शांताराम पिंगळे, विनोद कातड, शिवाजी हगवणे, दशरथ हगवणे, गोकुळ लांबे, रवी पेखळे, पंकज खताळे, संदीप बर्वे, हिरामण गोडसे, सचिन गोडसे, लालजी हंडोरे आदींसह 25 गावांतील शेकडो शेतकरी बैठकीला
उपस्थित होते.

Hold a decisive meeting by June 8, otherwise surround the BJP office

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago