संपर्क अधिकारी नेमूनही 2 ऑक्टोबरला जिल्ह्यात एकाही गावात सभा झाली नसल्याचा युनियनचा दावा
सिन्नर : प्रतिनिधी
ग्रामसभांवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकल्याने प्रशासनाने संपर्क अधिकार्यांची पर्यायी व्यवस्था करूनही 2 ऑक्टोबरची ग्रामसभा नाशिक जिल्ह्यात कुठेच झाली नसल्याचा दावा ग्रामपंचायत अधिकारी युनियनने केला आहे.
ग्रामसभा घेण्यासाठी संपर्क अधिकारी नेमले, मात्र ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामसेवकच काम करणार नसल्याने आता सभा घेण्यापासून ते ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापर्यंत प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ग्रामविकास विभागाच्या
निर्देशानुसार 2 ऑक्टोबरला ग्रामसभा घेण्याचे नियोजन होते.
मात्र, ग्रामपंचायत अधिकारी पातळीवरून पंचायत निर्णय पोर्टलवर ग्रामसभांचे वेळापत्रकच निश्चित करण्यात आले नसल्याने प्रत्यक्षात सभा झाल्या नाहीत, असे युनियनच्या पदाधिकार्यांचे
म्हणणे आहे.
सिन्नरमध्ये 114 संपर्क अधिकारी; तरी पेच कायम
ग्रामसेवकांच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर सिन्नरचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी 114 ग्रामपंचायतींसाठी मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, स्थापत्य अभियंता तसेच ग्रामपंचायत, कृषी व आरोग्य विभागातील विस्तार अधिकार्यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, ग्रामसभेत ग्रामस्थांनी पाणी, रस्ते, विकासकामे, निधी, शासकीय योजना किंवा ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न विचारल्यास त्याची अधिकृत माहिती कोण देणार? ग्रामसभेचे इतिवृत्त कोण लिहिणार? निर्णयांची नोंद आणि पुढील कार्यवाही कोण करणार? या प्रश्नांनी संपर्क अधिकार्यांच्या मनात धडकी भरली आहे.
ग्रामसेवकांच्या जागी आता पर्यायी सचिव
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 7(11)नुसार गावातील अन्य शासकीय अथवा निमशासकीय कर्मचार्यांची ग्रामसभा सचिव म्हणून नियुक्ती प्रशासक किंवा सरपंच यांच्या वतीने करता येते. त्यामुळे आगामी ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामसेवकांऐवजी पर्यायी सचिव नेमण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे.
2018च्या शासन निर्णयाचा दाखला
ग्रामपंचायत अधिकारी युनियनने 27 एप्रिल 2018च्या शासन निर्णयाचा दाखला दिला आहे. त्यानुसार 26 जानेवारी वगळता 1 मे, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या दिवशी ग्रामसभा न घेता त्याच महिन्यातील अन्य दिवशी सभा घेता येते, असा दावा युनियनने केला आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरलाच ग्रामसभा घेण्याच्या निर्देशावरून प्रशासन आणि ग्रामपंचायत अधिकार्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
‘ग्रामसेवक सचिव म्हणून काम करणार नाहीत’
दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभांसाठी प्रशासनाने संपर्क अधिकार्यांची पर्यायी व्यवस्था करूनही नाशिक जिल्ह्यात कुठेही ग्रामसभा झाली नाही. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि निश्चित केलेल्या विषयांवर पुढील आठवड्यापासून प्रशासक व सरपंचांशी चर्चा करून ग्रामसभा घेण्यात येतील. मात्र, ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेचे सचिव म्हणून काम करणार नाहीत.
– संजय गिरी, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन
Gram Sevaks’ Boycott; Gram Sabha Ends in a Fiasco!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…