नाशिक

सिन्नरमध्ये स्वच्छता मोहिमेत दोन ट्रॅक्टर कचरा संकलित

वावी वेस ते बसस्थानक परिसरात नगर परिषद पदाधिकारी, अधिकारी-कर्मचार्‍यांचा सहभाग; स्वच्छतादूतांचा सन्मान

सिन्नर : प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानांतर्गत सिन्नर शहरात गुरुवारी (दि. 2) सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वावी वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. वावी वेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश पेठ, नेहरू चौक, महात्मा जोतिबा फुले पुतळा परिसर तसेच बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्यात आली. मोहिमेत संकलित झालेला कचरा दोन ट्रॅक्टरद्वारे कचरा डेपोकडे पाठविण्यात आला.
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या संकल्पनेतून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून सिन्नर नगर परिषदेकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, नगर परिषद कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख व मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आले.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ‘स्वच्छता हीच सेवा’ हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. नागरिकांनी शहर स्वच्छ, हरित व सुंदर ठेवण्यासाठी उघड्यावर किंवा अन्यत्र कचरा न टाकता नगर परिषदेच्या घंटागाडीकडेच कचरा द्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, सभापती व नगरसेवकांच्या हस्ते स्वच्छतादूतांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गटनेते मनोज देशमुख, आरोग्य सभापती ललिता हांडे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती कांताबाई जाधव, बांधकाम समितीचे सभापती उदय गोळेसर, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, नगरसेवक अमोल झगडे, पंकज जाधव, अशोक जाधव, शुभम वारुंगसे, बाळासाहेब उगले, सुदर्शन नाईक, विलास जाधव, दत्तात्रय हांडे, योगानंद गवळी, अक्षय कानडी, ज्ञानेश्वर उबाळे, सुनील खोळंबे, सुदर्शन बोडके, राजू पवार, नगरसेविका योगिता वरंदळ, सुवर्णा उबाळे, लक्ष्मी पवार यांच्यासह शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, नगर अभियंता सौरभ गायकवाड, निवृत्ती चव्हाण, हसन शेख, कैलास झगडे, फकिरा उगले, लाला वाल्मीकी, राजेंद्र पवार, ताहीर शेख, बबलू शेख, उत्तम खैरे, संतोष जाधव, गणेश सोनवणे, प्रकाश घेगडमल, ज्ञानेश्वर जाधव, राहुल जाधव, काशिनाथ जाधव, संदीप जाधव, फिरोज शेख, सूरज डेंगळे, संदीप बनसोडे, दीपेश वैद्य, दीपक जाधव, सोमनाथ बोडके, राकेश नलगे, राहुल रणशिवरे, शोहेब शेख, मधुकर भालेराव, मिलिंद जाधव, छबू बोडके, नागेश पवार, वैभव सरोदे, मंजुषा तांबे, अंजना भालेराव, साजिदा शेख, अर्चना घेगडमल, जयश्री वैद्य, अरबाज शेख यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी व परिसरातील नागरिक
उपस्थित होते.

Two tractor-loads of garbage collected during the cleanliness drive in Sinnar.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago