नाशिक

‘हरित नाशिक’ लोकचळवळ व्हावी

ना. महाजन : ‘मिशन ग्रीन मॉन्सून’ अभियान

नाशिक : प्रतिनिधी
वाढते तापमान, अल निनोचे संकट आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. त्यासाठी ‘हरित नाशिक’ उपक्रम ही लोकचळवळ व्हावी. या चळवळीत प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.
‘उन्नत नाशिक अभियान’ आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणार्‍या कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक शहर आणि परिसरात ‘हरित कुंभ – हरित मॉन्सून’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फाशीचा डोंगर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य वनसंरक्षक गजेंद्र हिरे, नगरसेवक श्याम बडोदे, दिनकर पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.
गोदावरी, नंदिनी आणि कपिला या नद्या नाशिक शहराचे वैभव आहेत. या वैभवाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. नागरिकांनी हरित नाशिकसाठी आपले योगदान दिले पाहिजे. कचर्‍याचे वर्गीकरण केले पाहिजे. रस्त्यावर कचरा टाकू नये. मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या धर्तीवर आपण स्वच्छता राखली पाहिजे. तसे केले तर आपला परिसर, शहर, राज्य आणि देश स्वच्छ ठेवण्यास मदत होईल, असे महाजन म्हणाले. प्रारंभी दिनकर पाटील यांनी वृक्षारोपण मोहिमेची माहिती दिली. संदीप जाधव आणि शेखर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला सातपूर मनपा प्रभाग सभापती समाधान देवरे, नागरे, लता पाटील, सुधाकर बडगुजर आदींसह नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

‘Green Nashik’ should become a people’s movement.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago