नाशिक

पल्स पोलिओ लसीकरणात नाशिक आघाडीवर

पहिल्याच दिवशी चार लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण

नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत काल (दि. 28) नाशिक जिल्ह्यात 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्याच दिवशी 88.2 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यतील एकूण लोकसंख्येचा विचार करता, मोहिमेसाठी 4,75,592 बालकांचे अपेक्षित उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यापैकी 88.2 टक्के बालकांना पहिल्याच दिवशी पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्यात आली. मोहिमेच्या अचूक आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी तालुक्यात एकूण 4,107 लसीकरण बूथ तयार करण्यात आले होते.
मुख्य बूथव्यतिरिक्त दुर्गम भाग, शेतमळे तसेच प्रवासात असलेेल्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतली होती. यासाठी जिल्ह्यात 211 मोबाइल टीम्स आणि 109 ट्रान्झिट टीम्सची स्थापना करण्यात आली होती.
पहिल्या दिवशी बूथवर न येऊ शकलेल्या उर्वरित बालकांसाठी पुढील तीन दिवस आशा आणि आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत ‘घरोघरी’ खझझख फॉलोअप मोहीम राबवून जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नात राहू, अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, आणि अंगणवाडी कार्यकर्त्या यांनी अतोनात परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे शिक्षण व बालविकास विभाग, बालविकास विभाग, महाराष्ट्र वीज वितरण विभाग, एसटी बस स्टँड, रेल्वे विभाग यांचेदेखील सहकार्य मिळाले.

Nashik leads in Pulse Polio vaccination.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago