नाशिक

समृद्ध पंचायतराज अभियानात गुळवंचची झेप

जलतारा प्रकल्प, डिजिटल शाळा आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची दखल

सिन्नर : प्रतिनिधी
लोकसहभागाच्या बळावर विकासाची नवी वाट चोखाळणार्‍या गुळवंच ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, डिजिटल शिक्षण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध क्षेत्रांत राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची शासन नियुक्त मूल्यांकन समितीने पाहणी करून ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. गुळवंचने उभारलेला विकासाचा नमुना इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून गावातील शिवार रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पाणीटंचाई दूर करून शेतीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ‘जलतारा’ प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, त्यासाठी जनजागृती,
शिवारफेर्‍या आणि अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले. तसेच गट क्रमांक 795 मध्ये मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद शाळा (दगडवाडी व गंगाजी मळा) इमारतींची रंगरंगोटी, ‘बाला’ पेंटिंग, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच अंगणवाड्यांसाठी डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे डिजिटल प्रोफाइल आणि जनरल रजिस्टरचे डिजिटायझेशनही करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी एकल महिलांचा मेळावा घेण्यात आला असून, त्यांचा बचत गटांमधील सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात गरोदर महिलांच्या आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. याच कार्यक्रमात रमाई महिला बचत गटाला समाजकल्याण विभागामार्फत 90 टक्के अनुदानावर मिळालेल्या नवीन ट्रॅक्टरचे पूजन समितीच्या उपप्रमुख प्रगती इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले, तर उद्घाटन विस्तार अधिकारी दिगंबर सुरवसे यांच्या
हस्ते झाले. अभियानाच्या मूल्यांकनासाठी शासन नियुक्त समितीमध्ये मयुरी जांभूळकर (सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरोळ, जि. कोल्हापूर), दिगंबर सुरवसे (विस्तार अधिकारी, जावळी, जि. सातारा), विजयकुमार ढवळे (सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिन्नर), नीलेश भुजाळ (विस्तार अधिकारी), मच्छिंद्र कांगणे, अविनाश सहाणे (उपअभियंता, बांधकाम विभाग) आणि अंकित जाधव (उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी संजय गिरी यांनी पीपीटीद्वारे अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी ग्रामपंचायतीचे प्रशासक भाऊदास शिरसाठ, भरत कांगणे, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच गावपातळीवरील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुळवंच ग्रामपंचायतीने सुशासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून उभारलेले विकास मॉडेल इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरेल. विशेषतः जलव्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि शाळांचे डिजिटायझेशन हे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत.
– मयुरी जांभूळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरोळ (जि. कोल्हापूर)

Gulvanch’s leap in the prosperous Panchayat Raj campaign

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोगनवेल

पावसाळा सुरू झाला म्हणून जरा बागेत नवीन झाडं लावण्यासाठी नर्सरीत रोपं आणण्यासाठी गेले... नर्सरीत छान…

17 hours ago

केळीचे झाड आणि सत्यनारायण पूजा

- विष्णू वाघ भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांना केवळ वनस्पती म्हणून पाहिले जात नाही, तर त्यांच्यामध्ये देवत्व,…

17 hours ago

भूतान एक निसर्गरम्य देश

- पुष्पा गोटखिंडीकर हिमालयाच्या कुशीत वसलेला, हिरव्यागार सौंदर्याने नटलेला, डोंगरदर्‍यांनी वेढलेला ’भूतान’ देश पाहायला मिळणे…

17 hours ago

शिक्षणातून रोजगाराकडे…‘मविप्र’ची नवी ओळख!

मविप्र संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचा आज दि. 27 नोव्हेंबर 2026 रोजी वाढदिवस. त्यानिमित्त...…

17 hours ago

उपक्रमशीलता महत्त्वाची

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण असतो. शाळा, महाविद्यालय, शिकवणी, गृहपाठ आणि परीक्षांची तयारी…

17 hours ago

कॉलेज बंक चहा, मिसळ अन् मनमोकळे संवाद!

कॉलेज म्हटले की, वर्गातील लेक्चर्स, परीक्षा, मित्रमैत्रिणींचा गोतावळा आणि त्यासोबतच कधी तरी केलेला कॉलेज बंक!…

17 hours ago