नाशिक

सफाई ठेक्याची 237 कोटींची हनुमानउडी

अनावश्यक वाढवलेल्या 61 कोटींमुळे संशयाचे ढग

नाशिक : प्रतिनिधी
प्रारंभीपासून वादग्रस्त ठरलेला सफाई कर्मचारी ठेका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण यापूर्वी 176 कोटी खर्चून पाच वषार्ंसाठी या ठेक्याचे काम दिले जाणार होते. मात्र, अचानकपणे या ठेक्यात अतिरिक्त 61 कोटींंची वाढ करून तब्बल 237 कोटींवर नेण्यात आला आहे. दरम्यान, ठेक्याने अचानकपणे घेतलेल्या या हनुमानउडीची महापालिकेत
चर्चेचा विषय झाली आहे. आवश्यकता नसताना रक्कम वाढवल्याने महापालिका प्रशासनाच्या या निर्णयावर संशयाचे ढग निर्माण झाले आहे.
गेल्या 1 ऑगस्ट 2020 साली मनपा प्रशासनाने पंचवटीतील गंगाघाट परिसर परिसरासह पूर्व व पश्चिम विभागात रस्त्यांची सफाई करण्याकरिता 73 कोटी खर्चून वॉटरग्रेस कंपनीला हे काम देण्यात आले. 31 जुलै 2023 रोजी ठेक्याची मुदत संपुष्टात आली. मात्र, पदवीधर, शिक्षक, लोकसभा व विधानसभा आदी निवडणुकांमुळे निविदा प्रक्रिया राबवता आली नाही. परिणामी विद्यमान ठेकेदाराला सहावेळा मुदतवाढ देऊन रस्ते सफाईचे काम करून घेतले जात आहे. विधानसभेच्या तोंडावर महापालिका प्रशासनाने रातोरात ठेक्यातील अटी-शर्ती बदलल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले. अनपेक्षितपणे अटी-शर्ती ठेक्यात घातल्याने महापालिका प्रशासनाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले.
याप्रकरणी भाजपने थेट निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली. विद्यमान ठेकेदाराने न्यायालयात सदर प्रकरण नेले. तेथे महापालिकेला न्यायालयाने फटकारत अटी-शर्ती रद्द करून नव्याने निविदा राबवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाकडून तीन दिवसांपूर्वी निविदा प्रसिद्ध करण्यात आली; परंतु यापूर्वी 176 कोटींची रक्कम निश्चित केली असताना आवश्यकता नसताना या ठेक्यात 61 कोटींनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, 7 जुलैपर्यंत निविदा खुली असणार आहे.

कर्मचारी संख्या सातशेहून एक हजार 75 वर

यापूर्वी सफाई ठेक्यातील कर्मचार्‍यांची संख्या सातशे एवढी असता, त्यात वाढ करून ती 875 केली. पुढे त्यामध्ये आणखी तीनशे कर्मचार्‍यांची संख्या वाढवून एक हजार 75 नेण्यात आली. दरम्यान, सफाई कर्मचार्‍यांनी पंचवीस हजार 24 रुपये किमान वेतन दिले जाणार असल्याचे समजते आहे.

तपोवनात 300 अतिरिक्त कर्मचारी

दोन वर्षांंनी सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने प्रशासनाने पंचवटी, तपोवनातील साधुग्राम परिसरात अतिरिक्त तीनशे कर्मचार्‍यांची फौज ठेवली जाणार आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago