मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आता प्रचंड उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअस पार करून चाळीशी गाठतानाचे चित्र आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यभर उष्णतेचा अलर्ट दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यभरात कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विदर्भात पुढील दोन दिवसांत पारा तापणार असून, तीन जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसणार आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे जाईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ एस. डी. सानप यांनी वर्तवला आहे.
अमरावतीत सर्वाधिक तापमान
सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली. 40.8 अंश सेल्सिअस तापमान अमरावतीत नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमान हे 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात पुढील दोन दिवस तापमानाचा हाय अलर्ट दिला आहे. अकोला, अमरावती आणि वर्ध्यात पुढील दोन दिवस पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Heat will increase in the state
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…