नाशिक

मुसळधार पावसाने पर्यटनाला बहर

रविवारी पहिने बारीत पर्यटकांची वारी

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील निसर्ग पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरून गेली आहेत. दुगारवाडी धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव बंद केल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा पहिने बारीतील प्रसिद्ध नेकलेस धबधब्याकडे वळवला आहे. रविवारी नाशिक-त्र्यंबक रस्ता आणि पहिने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
हिरवीगार निसर्गसृष्टी, डोंगरावर पसरलेली धुक्याची चादर आणि अंगावर येणार्‍या पावसाच्या सरींचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक दाखल झाले होते. गरमागरम मक्याचे कणीस आणि मॅगीवर ताव मारत पर्यटकांनी रविवारची सुट्टी साजरी केली. मात्र, नाशिक-त्र्यंबक रस्त्याची एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने आणि चिखलामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागली.
पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी होत असली तरी काही हुल्लडबाजांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. धोकादायक जलप्रवाहात उतरून सेल्फी घेणे, बेदरकारपणे वाहने चालवणे, तसेच वादावादी करून मारहाण करण्याच्या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. संध्याकाळी शेतातून घरी परतणार्‍या ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, महिलांची छेडछाड आणि असभ्य वर्तनामुळे पहिने परिसराची शांतता धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने या हुल्लडबाजांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी त्रस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Heavy rains boost tourism

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

18 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

18 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

18 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

18 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

18 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

18 hours ago