नाशिक

अतिवृष्टी तरीही 498 गावांना टँकरचा आधार

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणे भरू लागली आहेत. अनेक नद्यांना पूर आला आहे. मात्र, या अतिवृष्टीनंतरही जिल्ह्यातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर झालेली नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अद्याप 498 गावे व वाड्या-पाड्यांना 119 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तब्बल 2 लाख 28 हजार 798 नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
24 जुलैपर्यंतच्या जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील 115 गावे आणि 383 वाड्या-पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी 119 टँकरच्या माध्यमातून दररोज 240 फेर्‍या मारल्या जात आहेत. विशेष म्हणजे, यंदा एकाही शासकीय टँकरची गरज भासलेली नसून, सर्व पाणीपुरवठा खासगी टँकरद्वारे होत आहे. सर्वाधिक टंचाईची झळ नांदगाव तालुक्याला बसली असून, येथे 250 गावे व वाड्या-पाड्यांतील 61 हजार 979 नागरिकांना टँकरने पाणी दिले जात आहे. येवला तालुक्यात 86 गावे-वाड्यांतील 78 हजार 459, मालेगावमध्ये 64 ठिकाणी 36 हजार 598, सिन्नरमध्ये 58 ठिकाणी 22 हजार 92, चांदवडमध्ये 14 ठिकाणी 18 हजार 840, देवळ्यात 18 ठिकाणी 5 हजार 589 आणि बागलाणमध्ये 8 ठिकाणी 5 हजार 241 नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात गंगापूरसह अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एका बाजूला अतिवृष्टी व दुसर्‍या बाजूला टँकरवर अवलंबून असलेली गावे, असा जलव्यवस्थापनातील विरोधाभास पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसामुळे काही भागांतील टँकरची गरज कमी होण्याची शक्यता असली, तरी भूजलपातळी अद्याप पूर्णपणे सुधारलेली नसल्याने व अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्ववत झालेल्या नसल्याने अनेक गावांमध्ये टँकरसेवा कायम ठेवावी लागत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

काही तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा
जिल्ह्यातील काही तालुक्यांत अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असल्याने अजूनही टँकर सुरू आहेत.

Despite heavy rainfall, 498 villages rely on water tankers.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

19 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

19 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

19 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

19 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

19 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

19 hours ago