नाशिक

ज्यांनी आमचा बाप काढला, त्यांना पाठिंबा कसा देऊ?

गोकुळ गिते यांचा विरोधकांना टोला

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे.अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते आणि अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे हे निवडणुकीच्या रिंगणात असून, या निवडणुकीत खर्‍या अर्थाने नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गिते अशीच चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र बघायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी आमचा बाप काढला, त्यांना आम्ही पाठिंबा कसा देणार, असा टोला अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी हाणला आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनदेखील गिते यांनी केले आहे.
गुरुवारी (दि.4) अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर सोशल मीडियावर एक नवीनच राजकीय चर्चा आणि अफवांना ऊत आला होता. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते हे महायुतीला जाहीर पाठिंबा देणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात होत्या. या सर्व चर्चांवर आता स्वतः गोकुळ गिते यांनी माध्यमांसमोर येत पडदा टाकला असून, विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सोशल मीडियावरील त्या पोस्ट पूर्णपणे अफवा असल्याचे गोकुळ गिते यांनी सांगितले. माघार घेण्याची मुदत संपली आहे. निवडणुकीच्या प्रचारात ज्या उमेदवाराने आमचा बाप काढला, त्या उमेदवाराला आम्ही कसा काय पाठिंबा देऊ शकतो? आता निवडणूक खूप पुढे गेली आहे, त्यामुळे कोणालाही पाठिंबा देण्याचा विषयच उरत नाही. या सर्व जाणीवपूर्वक पसरवल्या जाणार्‍या अफवा आहेत, मतदारांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

लढत होणार चुरशीची
गोकुळ गिते यांनी पाठिंब्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्यामुळे आता या निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. महायुतीचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष गोकुळ गिते यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

How can we support those who took away our father?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago