नाशिक

पत्नीवर ब्लेडने वार केल्याप्रकरणी पतीला दहा वर्षे सक्तमजुरी

पीडितेला एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

सिडको : प्रतिनिधी
पत्नीच्या गळ्यावर शेव्हिंग ब्लेडने वार करून तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. राजू पोपट मते असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, एका महिन्याच्या आत पीडितेला एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील अन्य चार आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. ही घटना 6
फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पंचवटीतील मोरे मळा परिसरातील कुसुमाग्रज उद्यानात घडली होती. या प्रकरणी कामटवाडा परिसरातील रहिवासी विजय त्र्यंबक सावंत यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
राजू मते याची पत्नी दिव्या सावंत ही माहेरी वडिलांकडे राहत होती. तिला मोबाइल देण्याच्या बहाण्याने राजूने तिला कुसुमाग्रज उद्यानात बोलावले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या विशाल राजू माने याने दिव्याची मैत्रीण खुशबू यादव हिला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याचवेळी राजूने हातातील शेव्हिंग ब्लेडने दिव्याच्या गळ्यावर वार करून तिच्या हत्येचा प्रयत्न केला. तसेच, दिव्याची सासू रेखा मते आणि नणंद दीपाली हेगडे व पूजा रेळेकर यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ करून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. पी. मुंढे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कोर्ट क्रमांक एकमध्ये या खटल्याची सुनावणी झाली. मंगळवारी (27 ऑक्टोबर) न्यायमूर्ती आर. एन. पांढरे यांनी साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे राजू मते याला हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावली. अन्य आरोपी विशाल माने, रेखा मते, दीपाली हेगडे आणि पूजा रेळेकर यांना पुराव्याअभावी
निर्दोष मुक्त करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेटकर यांनी काम पाहिले.

Husband sentenced to ten years of rigorous imprisonment for attacking wife with a blade

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नाशिकचा श्वास, व्यवस्थेचा फास!

- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…

6 minutes ago

समुद्राच्या पाण्यातून लिथियम

- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…

13 minutes ago

जीवघेणे प्रदूषण आणि वाढती वाहनसंख्या

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…

18 minutes ago

पाकिस्तानधार्जिणे

काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…

23 minutes ago

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…

56 minutes ago

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…

1 hour ago