नाशिक

दानिशच्या जामिनीवर आज सुनावनी

सिडको : प्रतिनिधी
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचार्‍यांना धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिश याच्या जामीन अर्जावर आज (दि. 28 ऑक्टोबर) अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित खारकर यांच्या न्यायालयात हा अर्ज सुनावणीसाठी येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
दानिशने यापूर्वी जुलै महिन्यात नाशिकरोड येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्या वेळी न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर आरोपीच्या वतीने नाशिक येथील सत्र न्यायालयात नव्याने जामीन अर्ज सादर करण्यात आला आहे.
या अर्जावरील सुनावणीत यापूर्वी जामीन नाकारण्यात आल्याची पार्श्वभूमी, आरोपीवरील आरोप आणि तपासात उपलब्ध झालेल्या पुराव्यांचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. तसेच प्रकरणाशी संबंधित कायदेशीर बाबींचाही विचार केला जाणार आहे. पीडित तरुणीवरील कथित अत्याचाराच्या आरोपांच्या अनुषंगाने तपासातील पुरावे न्यायालयासमोर मांडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांकडून मांडण्यात येणारे युक्तिवाद आणि त्यावरील न्यायालयाचे निरीक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. दानिशला जामीन मंजूर होतो की अर्ज
फेटाळला जातो, याबाबतचा निर्णय सुनावणीनंतर स्पष्ट होईल.

Danish’s bail hearing today

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नाशिकचा श्वास, व्यवस्थेचा फास!

- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…

7 minutes ago

समुद्राच्या पाण्यातून लिथियम

- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…

14 minutes ago

जीवघेणे प्रदूषण आणि वाढती वाहनसंख्या

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…

19 minutes ago

पाकिस्तानधार्जिणे

काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…

23 minutes ago

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…

57 minutes ago

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…

1 hour ago