नाशिक

मी उद्धव ठाकरेंसोबतच : खा. राजाभाऊ वाजे

शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचे वृत्त शुक्रवारी समाजमाध्यमावर येेताच नाशिकसह सर्वत्र खळबळ उडाली. या खासदारांत नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे यांच्याही नावाची चर्चा रंगली. दरम्यान, खा. वाजे यांनी ही बातमी फेटाळून लावत आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे स्पष्टीकरण दिले.
गेल्या काही दिवसांपासून शिंदेसेना उबाठाचे खासदार गळाला लावण्यासाठी ’ऑपरेशन टायगर’ राबवत असल्याची चर्चा वारंवार होत असते. दरम्यान, शुक्रवारी (दि. 10) सकाळी काही माध्यमांनी शिंदेसेनेसोबत उबाठाच्या खासदारांची बुधवारी रात्री उशिरा बैठक झाल्याचे सांगितले. अशा प्रकारचे वृत्त प्रसारित होताच खा. वाजे यांनी व्हिडिओद्वारे हा दावा त्यांनी खोडून काढत आपण कुठेही जात नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले.
खा. वाजे यांनी यापूर्वीदेखील शिंदेसेनेत प्रवेशाच्या
चर्चेचे खंडन केले आहे. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचे वृत्त शुक्रवारी आल्याने नाशिकमधील शिवसैनिकांमध्ये यावरून चर्चा रंगताना दिसली. अनेकांनी हा काय प्रकार आहे, असा प्रश्न कार्यकर्ते पदाधिकार्‍यांना विचारत होते.

मी आजही व उद्याही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. दुसरीकडे कुठेही जाण्याचा प्रश्न येत नाही. – खा. राजाभाऊ वाजे, नाशिक लोकसभा

I am with Uddhav Thackeray: Kha. Rajabhau Waje

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

14 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

14 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

14 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

14 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

14 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

14 hours ago