नाशिक

येवला टोलनाक्याजवळ ‘द बर्निंग ट्रक’

लष्कराचे सामान जळून खाक; ट्रक पेटला की पेटवला संशयाचा धूर

येवला : प्रतिनिधी
येवला-कोपरगाव राज्य महामार्गावर येवला शहरातील पिपळगाव शिवारातील टोलनाक्यावर लष्कराचे सामान घेऊन जाणार्‍या आयशर ट्रकला भीषण आग लागून ट्रकचे मोठे नुकसान होऊन यातील सामान जळून खाक झाले. ही घटना सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी येवला नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी आल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात मदत झाली. ट्रक आणि ट्रकमधील सामान जळून खाक झाले. मात्र, कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या टोलनाका परिसरात असलेल्या वाहतूक पोलिसांनी हुज्जत घातली आणि ट्रक पेटला, असा आरोप संबंधित ट्रकचालक जगतार सिंग (रा. पंजाब) यांनी केला आहे. हा आयशर ट्रक हा पुण्यावरून येवलामार्गे पुढे चालला होता.

पिंपळगाव टोलनाक्याजवळ पोलिसांनी त्यांना नो एन्ट्रीचे कारण सांगून अडवले. यावेळी 30 हजार रुपयांचे अधिकृत चलन किंवा 5 हजार रुपयांची मागणी झाल्याचा दावा चालकाने केला आहे. चालकाने लाच देण्यास नकार दिल्याने पोलीस आणि चालक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वादावादीदरम्यान एका पोलीस कर्मचार्‍याने ओढत असलेली सिगारेट ट्रकच्या दिशेने
फेकली. ट्रकमध्ये एसी गॅसचे सिलिंडर (बाटल्या) असल्याने त्या ठिणगीमुळे भीषण स्फोट झाला. आगीचे गोळे आणि गॅसच्या बाटल्या हवेत उडाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
येवला नगरपालिकेचा अग्निशमन बंब दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पोलिसांच्या या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

‘The Burning Truck’ near Yeola toll plaza

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

16 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

16 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

16 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

16 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

16 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

16 hours ago