सोमठाणे शिवारात अवैध दारूसाठा जप्त

 

नाशिक उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई, दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सिन्नर ः प्रतिनिधी

तालुक्यातील सोमठाणे-चासनळी रस्त्यावर सोमठाणे शिवारात नाशिक उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूसाठा व वाहतूक करणारे वाहन असा एक लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आला.

नाशिक उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोमठाणे गावच्या शिवारात रात्री गस्त घालत असताना गावानजीक सेन्ट्रो कार (एमएच 15, एएस 4124)ची तपासणी केली. गाडीत देशी दारूच्या 180 मिलिच्या 624 सीलबंद बाटल्या (13 बॉक्स), तर 90 मिलिच्या 100 सीलबंद बाटल्या (1 बॉक्स) मिळून आल्या. कृष्णा रामभाऊ धोक्रट (28, रा. सोमठाणे) या चालकाला दारूची अवैध वाहतूक करताना आढळून आल्याने ताब्यात घेण्यात आले. दारू वाहतूक करण्यासाठी वापरात आलेले वाहन व दारूसाठा मिळून एकूण एक लाख 90 हजार 440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत नाशिक उत्पादन शुल्कचे अधीक्षक शशिकांत गर्जे, प्रभारी उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक रोहित केरीपाळे, राहुल राऊळ, जवान सुनील दिघोळे, धनंजय पवार, राहुल पवार, महेंद्र भोये, अनिता भांड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *