गोदावरी गटारीकरणविरोधी मंचचा उपक्रम
नाशिक : प्रतिनिधी
दहा ते पंधरा वर्षांपासून गोदावरी गटारीकरणविरोधी मंच व विविध स्वयंसेवी पर्यावरणपूरक संस्था गणेशोत्सवादरम्यान गोदावरी नदीकिनारी पाचव्या दिवशी चोपडा लॉन्स येथे नाशिक महापालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलाव तयार करून गणेशमूर्ती संकलन केल्या. वाचवू या भगवान नक्कीच
भ- भूमी, ग- गगन, वा- वायू, न- नदी अर्थात, भगवान. पर्यावरणाने दिलेले समृद्ध आरोग्यदायी जीवन आपण भौतिक सुखाच्या हव्यासापायी नष्ट करण्याच्या मागे लागल्याने संपूर्ण सजीवांचे आयुष्यमान कमी होत चालले आहे.
पर्यावरणाचेे संरक्षण करण्यासाठी सर्वांनाच पुढे यावे लागत आहे. याही वर्षी भाविकांकडून जवळपास पाचशेच्या वर गणेशमूर्ती संकलित केल्या असून, याबरोबर मोठ्या प्रमाणात निर्माल्यही संकलित केले आहे. गोदावरी नदी व नंदिनी, वरुणा, कपिला व वालदेवी या उपनद्या प्रदूषणमुक्त झाल्या पाहिजेत, तसेच प्लास्टिक ऑफ पॅरिस वापरावर बंदी यावी यासाठी विविध पद्धतीने भाविकांचे
प्रबोधन केले. यावेळी पाचशे गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.
जास्तीत जास्त भाविकांनी गणेशमूर्ती स्वयंसेवकांकडे देऊन किंवा स्वत: कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित केल्या. या उपक्रमात निशिकांत पगारे, सुनील परदेशी, प्रा. सोमनाथ मुठाळ, योगेश बर्वे, उदय थोरात, यशवंत नाशिककर, श्रद्धा दुसाने, आरती अहिरे, रूपाली तांबोरे, स्पर्श बत्तासे, रोहिणी कुमावत, दिल्ली पब्लिक स्कूलच्या गुंजन शर्मा, अनुजा टी, सुप्रिती बी. एचपीटी महाविद्यालयाचे प्रा. मनोज गिरम, जयकृष्ण देवरे, लकीकुमार सिंग, निखिल राय, अतिश यादव, राधिका बलायार, नम्रता जाधव, कनिष्का शर्मा, आशू पंडित, वेदांत तिवारी, कल्पेश अनकईकर, गणेश भिवरकर, गिरीश गांगुर्डे आदींसह विद्यार्थी
उपस्थित होते.