भारतात दोन दिवस उष्णतेची लाट

 

नवी दिल्ली : वाढत्या उष्णतेमुळे आधीच अंगाची लाही लाही झालेली असताना – आता पुन्हा दोन दिवस संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट कायम राहणार आहे . भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवस भारतात उष्णतेची लाट असणार आहे . भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार , येत्या काही दिवसांत देशाच्या वायव्य आणि मध्य भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे . उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहील आणि त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल . आयएमडीने आपल्या हवामान बुलेटिनमध्ये म्हटले आहे की , येत्या तीन दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही . त्यानंतर तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल . दरम्यान , पुढील दोन दिवसांत भारताच्या पूर्व भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *