♦ तिसर्यांदा सीरिजवर कब्जा
♦ अभिषेक-वैभवची विक्रमी भागीदारी
वेलिंग्टन :
टीम इंडियाने वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडचा तिसर्या टी-20 सामन्यात सहा विकेट्सने धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. यासह भारताने न्यूझीलंडच्या भूमीवर सलग तिसरी टी-20 सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला आहे. याआधी 2020 मध्ये 5-0 आणि 2022 मध्ये 1-0 अशी मालिका जिंकली होती. भारताच्या विजयाचे हिरो ठरले सलामीवीर अभिषेक शर्मा आणि 15 वर्षीय वैभव
सूर्यवंशी.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिशेलच्या नाबाद 89 धावांच्या जोरावर 198/3 धावा केल्या होत्या. 199 धावांचे आव्हान भारताने केवळ 13.2 षटकांत पूर्ण
केले.
अभिषेकने फक्त 38 चेंडूंत 113 धावा (9 चौकार, 11 षटकार) ठोकल्या. त्याने 15 चेंडूंत अर्धशतक आणि 35 चेंडूंत शतक पूर्ण केले. हे त्याचे टी-20 इंटरनॅशनलमधील दुसरे सर्वात वेगवान शतक आहे, गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 30 चेंडूंत शतक केले होते. त्याला वैभवने 4 चौकार आणि 4 षटकारांसह 19 चेंडूत 45 धावा फटकावून जबरदस्त साथ दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी फक्त 7.1 षटकांत 133 धावांची भागीदारी केली.
या भागीदारीत अनेक विश्वविक्रम झाले –
पॉवरप्लेमध्ये 118 धावा : हा टी20 इंटरनॅशनल इतिहासातील सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर ठरला. 100+ धावांच्या सलामी भागीदारीत 18.13 चा रनरेट : हा पुरुषांच्या टी20 मधील सर्वात वेगवान 100+ सलामी भागीदारीचा विश्वविक्रम आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या बटलर-सॉल्ट (16.08) यांच्या नावावर होता. पहिल्याच षटकात जेकब डफीच्या 26 धावा कुटत भारताने सामन्याची हवाच काढून घेतली. कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, 5 षटकांत 100 धावा मी आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच पाहिल्या.
India’s dominance in New Zealand
- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…
- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…
काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…
शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…
भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…