‘आरबीआय’ची 6% ची मर्यादा ओलांडणार?
नवी दिल्ली : प्रतिनिधी
सामान्य माणसाच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. 11 अर्थतज्ज्ञांच्या एका सर्वेक्षणानुसार, ऑक्टोबर महिन्यात भारतातील ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई 6.1 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हे गेल्या 24 महिन्यांतील, म्हणजे ऑक्टोबर 2024 नंतरचे सर्वोच्च पातळी आहे. सप्टेंबरमध्ये हा दर 5.54 टक्के होता. या वाढीमागे मुख्य कारण आहे अन्नधान्य महागाई सप्टेंबरमध्ये 7.74 टक्के असलेली अन्न महागाई ऑक्टोबरमध्ये 8 टक्क्यांच्या वर गेली असण्याचा अंदाज आहे. असमान आणि कमी पावसामुळे भाजीपाला, धान्य, डाळींचा पुरवठा कमी झाला. त्याशिवाय अन्न आणि इंधन वगळून मोजली जाणारी कोअर महागाईही 4.3 टक्क्यांवरून 4.6 टक्क्यांपर्यंत वाढून मालिकेतील उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
Inflation set to flare up! Loan installments to become costlier