एकाच दिवशी पाच सुवर्णपदके

मुंबई : प्रतिनिधी
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी काल तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई केली. तिरंदाजी, बॉक्सिंग आणि कुस्तीत ही सुवर्णपदके जिंकली आहेत. पासष्ट किलो वजनगटातील सुजीत कलकल याची कुस्ती अंगावर शहारा आणणारी होती. फक्त एका गुणाने त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.
कुस्ती सुरू झाल्यावर 9-3 असा पिछाडीवर असलेल्या सुनीलने शेवटला आक्रमक खेळ करत 10-9 ने सामना जिंकला. महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक पदकविजेत्या लव्हलिना बोरगोहेनने यजमान चीनच्या बाओ झियीचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. चीनच्या बॉक्सरला तिच्याच देशात मिळणार्‍या मोठ्या पाठिंब्याला न जुमानता लव्हलिनाने कमालीचा संयम राखत मेरी कोमनंतर एशियन गेम्समध्ये सुवर्ण जिंकणारी दुसरी भारतीय महिला बॉक्सर होण्याचा मान मिळवला. पाठोपाठ अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोद या त्रिकुटाने महिला रिकर्व्ह आर्चरी प्रकारात बलाढ्य दक्षिण कोरियाच्या संघाला 5-3 अशा सेट पॉइंटच्या फरकाने धूळ चारत तिरंदाजीत भारतासाठी ऐतिहासिक पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावले. बॉक्सिंग रिंगमधून भारताला आणखी दोन सुवर्णपदके मिळाली. महिलांच्या 65 किलो वजनी गटात परवीन हुड्डा हिने चायनीज तैपेईच्या माजी जागतिक चॅम्पियन चेन निएन-चिन विरुद्ध अतिशय चुरशीचा सामना खेळला.

Golden ‘punch’ of Indian players

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

1 hour ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

1 hour ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

1 hour ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

1 hour ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago