अशोक खरात विरोधात संताप; फाशीची मागणी, दारणा-गोदावरी पाणीप्रश्नी निवेदन
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील कथित भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ सिन्नर तहसील कार्यालयासमोर गुरुवारी (दु. 2) सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने ‘जोडेमारा’ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी खरातच्या प्रतिमेला चप्पल मारून संताप व्यक्त केला.त्याच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, तरुण व महिलांनी सकाळी सुमारे 11.30 ते 12.30 या वेळेत आंदोलन केले. अवकाळी पावसामुळे नियोजित धरणे आंदोलनाऐवजी प्रतीकात्मक जोडेमारा आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘बलात्कार्याला फाशी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून
गेला.
आंदोलकांनी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्यासह या प्रकरणामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. तसेच 2020 मध्ये खरातच्या फार्महाउसला दारणा धरणाचे पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
याचबरोबर दारणा, गोदावरी नदीचे पाणी सिन्नर तालुक्यातील शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शरद शिंदे पाटील, शिवाजी गुंजाळ, चिंध्या गुंजाळ, बाबासाहेब शेळके, अरुण पाचोरे, भागवत शेळके, गणपत नाठे, दामोदर आडके, बाळासाहेब आव्हाड यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
‘Jode Mara’ protest in front of Sinnar Tehsil
सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…
नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…
पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…
रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…
संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…