नाशिक

कोनांबे, उंबरदरी धरण इतिहासात जूनमध्येच ओव्हरफ्लो

आठ गावच्या पाणीयोजनांना मिळाली संजीवनी

सिन्नर : प्रतिनिधी
पश्चिम पट्ट्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने गुरुवारी (दि. 19) दुपारी 2 वाजेच्या सुमारास कोनांबे आणि ठाणगावच्या वरच्या बाजूला असलेले उंबरदरी ही दोन्ही धरणे ओव्हर-फ्लो झाली आहेत. सिन्नरच्या इतिहासात पहिल्यांदाच ही दोन्ही धरणे जूनच्या मध्यातच ओव्हरफ्लो झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्याची जीवनदायिनी असलेली देवनदी आणि पश्चिम पट्ट्यात उगम पावणारी म्हाळुंगी नदी प्रवाही झाली आहे. गेल्या वर्षी 27 आणि 28 जुलै रोजी धरण ओव्हरफ्लो झाले होते. यंदा तब्बल सव्वा महिना अगोदरच ही दोन्ही धरणे भरून देवनदी आणि म्हाळुंगी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने या दोन्ही धरणांमध्ये काही प्रमाणात पाणी साठा झाला होता.
कोनांबे धरणावर कोनांबे, सोनांबे, सोनारी येथील पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, या योजनांना धरण ओव्हरफ्लो झाल्याने तीन गावच्या पाणीयोजनांना संजीवनी मिळाली आहे. देवनदीवरून राबवण्यात आलेली कुंदेवाडी – सायाळे ही पूरचारी योजना पूर्ण झाल्याने पूर्व भागातील शेतकर्‍यांच्या नजरा पूरपाण्याकडे लागल्या आहेत. धरणाच्या वरच्या भागातील धोंडबार, औंढेवाडी शिवारातील बांध, बंधारे भरल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाढ होऊन कोनांबे धरणाच्या सांडव्यातून पडलेले पाणी देवनदीद्वारे पूर्व भागाकडे झेपावले. मे महिन्यात झालेल्या पावसाने वाहणार्‍या नदीच्या प्रवाहात आणखी वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या अत्यल्प पावसात धरण 28 जुलै रोजी भरले होते. तुलनेत यंदा धरण सव्वा महिना अगोदर ओव्हरफ्लो झाले. यंदा पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे पूर्व भागातील शेतकर्‍यांना देवनदी जोरदार प्रवाही होण्याची अपेक्षा लागून होती. कोनांबे धरण ओव्हरफ्लो झाल्याने देवनदी काठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
मे महिन्यात झालेल्या पावसाने उंबरदरी धरण निम्मे भरले होते. बुधवारी रात्री आणि गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले. उंबरदरी धरणावर ठाणगांवसह 5 गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. धरण भरल्याने या पाच गावांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे. शिवाय, म्हाळुंगी नदी प्रवाही झाल्याने भोजापूरच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्यास मदत होणार आहे.

दुष्काळी गावांत लवकर मिळणार पाणी

गेल्या वर्षी शेवटच्या चरणात जोरदार पाऊस झाल्याने देवनदीचे पाणी पूरचारीतून पूर्व भागातील गावांना मिळाले होते. कुंदेवाडी – सायाळे या बंदिस्त पूरचारीचे काम 36 किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. तर खोपडी – मिरगाव पूरचारीचे कामही बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे. मे महिन्यात झालेल्या पावसाने देवनदी खळाळून पाणी दातलीच्या पुढे गेले होते. आता प्रवाहात जोराची वाढ झाल्याने अल्पावधीतच देव नदीचे पूरपाणी सांगवी येथे गोदावरीला जाऊन मिळेल. त्यामुळे देवनदीचे पूरपाणी जुलै महिन्यात किंवा तत्पूर्वीच पूर्व भागातील दुष्काळी गावांना मिळण्याची अपेक्षा बळावली आहे.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago