नाशिक

नवीन कसारा घाटात दरड कोसळली

नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत

इगतपुरी : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गावर सोमवारी झालेल्या पावसामुळे नवीन कसारा घाटात मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली. रात्रभर झालेल्या पावसाने दरड कोसळली असून, या घटनेत सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही. कोसळलेल्या दरडीमुळे नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
पावसामुळे धुक्याची चादर महामार्गावर पसरली होती. कोसळलेल्या दरडीचा मलबा महामार्गावरून काढण्यासाठी जेसीबी न मिळाल्याने महामार्ग सुरक्षा पोलीस कर्मचारी यांनी स्वतः पडलेले दगड, माती बाजूला करीत महामार्ग वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न केले. यावेळी दरड कोसळलेल्यापैकी मोठे दगड ढकलून बाजूला करताना घोटी टॅब महामार्ग सुरक्षा पोलीस कर्मचार्‍यांच्या हाताला व पायाला किरकोळ जखमा झाल्या. यावेळी पोलिसांचे प्रयत्न पाहत वाहनचालकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिसांनी खंत व्यक्त केली.
पावसाळ्यात दरवर्षी कसारा घाटात दरड कोसळण्याच्या व मातीसह झाडे पडण्याच्या घटना होत असतात. अशा वेळी पर्यटक व प्रवासी लहान-मोठे धबधबे पाहण्यासाठी किंवा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आणि मोबाइलने फोटो व सेल्फी काढण्यासाठी घाटात थांबतात. अपघात होऊ नये यासाठी महामार्ग सुरक्षा पोलिसांची गस्त सुरू असून, अपघात क्षेत्रात कोणीही थांबू नये, असा इशारा दिला जातो, तरीही पर्यटक सहकार्य करीत नसल्याने अशा घटना घडतात. पर्यटकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग पोलीस अधिकारी राम व्होंडे यांनी केले आहे. पावसाळ्यात महामार्गावर होणार्‍या अपघाताचे प्रमाण पाहता योग्य ती खबरदारी घेत महामार्ग सुरक्षा पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले असल्याची माहिती राम व्होंडे यांनी दिली.

 

Editorial Team

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

8 hours ago