नाशिक

निफाड बसस्थानकासमोरील रस्ता दुभाजक अखेर तोडला

वाहतुकीची कोंडी होणार कमी, टपर्‍या हटविणार, शिवसेना शहरप्रमुखांच्या प्रयत्नांना यश

निफाड तालुका : प्रतिनिधी
निफाड बसस्थानकासमोर वाहतुकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी बसस्थानकाच्या पश्चिम बाजूचे गेट सुरू करावे. बस वळण्यासाठी अडथळा ठरणारे रस्ता दुभाजक तोडण्यात येऊन बसस्थानकात बस जाताना अडथळा ठरणार्‍या टपर्‍या तत्काळ काढाव्यात, शिवसेना शहरप्रमुख संजय धारराव यांनी प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता.
याबाबत दैनिक गांवकरीने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे होत काल मंगळवारी (दि. 27) सायंकाळी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता दुभाजक तोडत त्यातून निघणारे मटेरियल बसस्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी वापरत टपर्‍या हटविण्याची कार्यवाही सुरू केल्याने प्रवासी व निफाडकरांनी दैनिक गांवकरीचे अभिनंदन केले आहे. निफाड बसस्थानकासमोर सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी निफाड शिवसेना शहरप्रमुख धारराव यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्यमार्ग परिवहन महामंडळ, नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले असून, संबंधित अधिकार्‍यांनी तातडीने ही समस्या दूर करण्यास उपाययोजना सुरू केली आहे.
सोमवारी (दि. 26) लासलगाव बस आगारप्रमुख सविता काळे, वाहतूक व्यवस्थापक नितीन बोठे, वाहतूक नियंत्रक विजय गवळी, विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सागर भांगरे, संदीप मोगल, निफाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमोल चौधरी आदी मान्यवर अधिकारी निफाड बसस्थानकात दाखल झाले. संजय धारराव यांनी बसस्थानकातील समस्यांची जंत्री त्यांच्यासमोर मांडली. संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांना कडक शब्दात ताकीद देत आपल्या टपर्‍या तत्काळ काढून घेण्याचे आदेश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनीही रस्ता दुभाजक तोडून त्यातून निघणारे मटेरियल बसस्थानक प्रवेशद्वारावर असणारे खड्ड्यांत टाकून खड्डे बुजून देण्याचे आश्वासन दिले. आगारप्रमुख काळे यांनीही बसस्थानकातील अस्ताव्यस्त असणारी वाहने दिसल्यास पार्किंग ठेकेदाराचा परवाना रद्द करण्याची ताकीद दिली. परिणामी, या परिसरात होणारी वाहनांची कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. हा प्रश्न शिवसेना निफाड शहरप्रमुख धारराव यांनी लावून धरत अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला होता, त्यांना शिवसेना ठाकरे पक्षाचे रमेश जेऊघाले, योगेश कुंदे, राजू हरगावकर, सचिन गिते, बाळासाहेब डांगरे, रतन गाजरे, आकाश धुमाळ यांनी समर्थन दिले. लासलगाव बस आगारप्रमुखांनी संबंधित व्यावसायिकांना सूचना केल्याने हे व्यावसायिकदेखील सायंकाळी आपापली दुकाने मागे घेणार आहेत, तर काहीजण घरी घेऊन जाणार आहे. गेले अनेक वर्षांपासून बंद अडलेले बसस्थानकाचे गेट पूर्णक्षमतेने चालू होऊन वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी दैनिक गांवकरीचे आभार मानले आहे.

                                                      गांवकरी इंपॅक्ट     

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, जनमानसात रमणारे गावकरी तालुका प्रतिनिधींकडेे पाणी, वीज, रस्ते याबाबत गार्‍हाणी मांडली, तर त्याचा पाठपुरावा करण्याबरोबरच तो प्रश्नांची सोडवणूक करेपर्यंत व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यात गावकर्‍यांची नेहमीच मोलाची भूमिका राहिली आहे. आतादेखील कित्येक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.
– संजय धारराव, शहरप्रमुख, शिवसेना, निफाड

 

Editorial Team

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago