नाशिक : प्रतिनिधी
टाटा समूहाचा एक भाग असलेली व भारतीय शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करणार्या तसेच पीक संरक्षण आणि माती व वनस्पती पोषण क्षेत्रात दर्जेदार उत्पादने देणार्या ‘रॅलिज इंडिया लिमिटेड’ या नामांकित कंपनीच्या वतीने चार नवीन उत्पादनांचा शुभारंभ नुकताच नाशिक आणि पंढरपूर येथून
करण्यात आला.
आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक संरक्षणासाठी शेतकर्यांना वाजवी व रास्त दरात उच्च दर्जाची पीक संरक्षण औषधे उपलब्ध करून देणे या मुख्य उद्देशाने ही उत्पादने बाजारात आणली आहेत.
यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी शुभ्रा मुजुमदार यांनी कंपनी दरवर्षी पाच ते सहा नवीन उत्पादने शेतकर्यांना देणार आहे. शेती वाचली तरच हा व्यवसाय होईल, यासाठी शेतकर्यांना चांगले व योग्य मार्गदर्शन करून चांगली उत्पादने त्यांना द्या, असे कळकळीचे आवाहन उपस्थित डीलर व वितरकांना केले. भविष्यातही कंपनी सुरक्षित पीक संरक्षण आणि अत्याधुनिक पीक पोषण तंत्रज्ञानावर भर देणार आहे
फिप्लाम हे कीटकनाशक टोमॅटो, कांदा, भाजीपाला, फळपिकांवरील थ्रीप्स, जाशीड, पांढरी माशी, या रसशोषक किडींवर प्रभावी कार्य करते. केंजन हे नवीन टेनेबिनल टेक्निकलचे ग्रुप 30 मधील कॉन्टॅक्ट व इंजेक्शन अॅक्शन असलेले अतिशय प्रभावी कीटकनाशक डाळिंब, मिरची, वांगी, कोबी, भेंडी व इतर भाजीपाल्यासाठी उपयुक्त आहे. मार्सेलस हेही सर्व भाजीपाला, फळपिकांसाठी अंतरप्रभावी बुरशीनाशक आहे. गेरवा, करपा, भुरी, ठिपका, कूज यावर
प्रभावी आहे. ब्लायटॅक्स सुपर हे एक जिवाणूनाशक व बुरशीनाशकाचे कोंबिनेशन आहे. डाळिंब, द्राक्षे, व भाजीपाल्यावरील जिवाणूजन्य करपा, कूज, बॅक्टेरियल लीफ स्पॉट, फळकूज अशा रोगांसाठी उपयुक्त आहे. कार्यक्रमास नाशिक व सोलापूर विभागातील 50 सुपर स्टॉकिस्ट आणि सहाशेपेक्षा जास्त विक्रेते (रिटेल पार्टनर्स) उपस्थित होते. कार्यक्रमास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी – सुभ्रा मझुमदार-सेल्स हेड, रवींद्र पाटील, संबित मोहंती, अरूप कुमार, अमिताभ चौधरी, समीर माने (डीएमएम-पुणे), विपुल भवर, महेश भदाणे, भारत दातकर यांच्यासह नाशिक विभागातील सर्व अधिकारी व फिल्ड स्टाफ उपस्थित होते. उपस्थितांना नवीन उत्पादनांच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन
करण्यात आले.
Launch of four new products by Rallis India