निसर्गत्व
जेव्हा आपल्या घरात जन्माला आलेले मूल हे ती किंवा तो नसून ते आहे हे जेव्हा समजते तेव्हा त्या व्यक्तीवर नको ती बंधनेे लादली जातात. अशा प्रसंगी अशा व्यक्तींना समजून घेण्याची गरज असते. मानव हा समाजशील प्राणी आहे. कुटूंब ही त्याची पहिली सामाजिक संस्था असते जी त्याच्या मानसिक भावनीक शारिरीक गरजा पूर्ण करत असते.आणि ह्याच कुटुंबाकडून जेव्हा समजून घेतले जात नाही अशावेळी व्यक्ती नको मार्गाला जातात. मनाविरुद्ध लैंगिक शोषणही केले जाते.
प्रसंग 1:
रिया आणि रविचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नाला 15 दिवस होत नाही तर यांच भांडण थेट कोर्टात दाखल घटस्फोटासाठी.अर्थात कारण ही तसेच होते.र विच्या मते रिया पुर्णत: स्त्री नव्हती. खरे तर ही बाब रियाच्या घरच्यांच्या लक्षात आलेली होती. जेव्हा रिया 12 वर्षांची झाली तेव्हा ना तिला सामान्य मुलींप्रमाणे ऋतूचक्र सुरु झाले ना तिच्या वक्षभागाला उभार आला. ती पुर्णत: स्त्री नाही याची जाणीव तिच्या घरच्यांना झाली आणि तिच्या पाठीवर असणार्या भावंडाचा नि घर की इज्जतचा विचार करता त्यांनी तिचे लग्न रविशी लावून दिले.. नव्हे रविची फसवणूकच केली.
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन : उपचाराबरोबरच मानसिक आधारही
प्रसंग 2:
सागर हा साधारण तिशीतला मुलगा. परंतु 13-14 व्या वर्षापासूनच त्याला साड्या घालायची भारी हौस. बायकांसारखे नटणे, कपडे घालणे हे त्याला जाम आवडायचे.
पण तू मुलगा आहेस… असा काय बायल्यांसारखा वागतोस ….म्हणनू त्याला हिणवत असे.
ही त्याच्या मनाची घालमेल पुढेही चालूच राहीली. आणि आज तो उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन नोकरीही करतो. परंतु त्याच्या मनातील ती सुप्त इच्छा आज ही त्याला खुणावते स्त्री होण्याची.
आणि आज तो ट्रान्सजेंडर होण्याच्या तयारीत आहे. परंतु ट्रान्सजेंडर झाल्यावर माझ्या घरचे मला स्विकारतील कामाझ्यावर आई बाबांची जबाबदारी आहे. समाज काय म्हणेल म्हणून मी माझ्या भावना मारत जगायचं का?
वरील प्रसंगांतून मला काय मांडायचे आहे याची आपणांस कल्पना आलीच असेल. होय आज आपण एल.जी.बी.टी. समुहाबद्दल बोलणार आहोत. समुपदेशक या नात्याने या प्रकारच्या चे समुपदेशन करायची वेळ बर्याचदा आली आहे. त्यातून हा अनुभव लिहित आहे.आजवर आपण स्त्री किंवा पुरूष हे फक्त बाह्यांगावरुन ठरवत आलो. परंतु त्यापलीकडेही एक टप्पा आहे.
अल्पवयीन मुलींशी ओळख वाढवत विनयभंग
कुठलीही व्यक्ती तिच तिचे निसर्गत्व घेऊन आलेली असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात एक्स व वाय क्रोमोझोमचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असते.त्यातुन त्या व्यक्तीची शरीररचना व मानसिकता ठरत असते. माझ्या परिचयात अनेक व्यक्ती आहेत ज्या ट्रान्सजेंडर झालेल्या आहेत. ज्यांनी स्वत:ला न्याय दिला आहे. स्वत्वाची जाणीव झाली स्वत:साठी जगताय. वरील दोन प्रसंग प्रतिकात्मक आहेत. ही परिस्थिती काही अंशी बदल केला तर बर्यांच घरांमधे आहे. गरज आहे तो आपला दृष्टीकोन बदलण्याची. त्यांना स्विकारण्याची .ज्यांना निसर्गाने बनवले जे काही आहे ते आहे तसे बहाल केले अशा वेळी आपण त्या व्यक्तीचा नव्हे तर निसर्गाचाच अपमान करतो.निसर्गाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यासाठी निसर्गत्व ही बहाल केले आहे. त्याच निसर्गत्वाचा आदर करा.माणसाला माणूस म्हणून जगू द्या.माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच खरे सत्य.चला तर मग आजपासून स्त्रीत्व आणि पुरूषत्व या पलीकडे ही एक तत्व आहे त्याचा स्विकार करुयात ते आहे निसर्गत्व
(सदर लेखातील सर्व पात्रे व नावे काल्पनिक आहेत. दैनंदिन आयुष्यात याचा कोठेही काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजण्यात यावा.)
हे ही वाचा :