– सुप्रिया सुरवाडे

सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती…? या शुष्क होत जाणार्‍या जगात…कोरड्या संवेदना घेऊन जगणार्‍या जगात….काय हवंय माणसाला…? घर, गाडी…? बंगला…? संपत्ती…? कदाचित हो पण त्याहीपलीकडे माणूस शोधत असतो… एक असा कोपरा जो त्याचा हक्काचा असेल….ऐकणारे कान…..आणि एक सुंदर हृदय जे त्याच्या भावना समजून घेईल…..कुठलीही प्रतिक्रिया न देता….कुठल्याही प्रकारे त्याला न तोलता मोलता फक्त आणि फक्त ऐकून घेणारं…. मग ती व्यक्ती असेल… एखादी सुंदर जागा असेल… काहीही…. पण विशेषतः व्यक्तीच…
काल एक फार सुंदर ओळ वाचण्यात आली… एखादी सांगणारी, व्यक्त होणारी व्यक्ती असेल… ती काही सांगत असेल… तर फक्त शांतपणे ऐकून घ्या… त्या व्यक्तीला तिथे कुठल्याही शब्दांची, तुमच्या उपदेशाची गरज नसते… फक्त ऐकणारे कान आपल्याला व्हायचं असतं… आणि खर सांगू खूप भाग्यवान आणि शक्तिशाली व्यक्ती आहेत त्या व्यक्ती, ज्या समोरच्या व्यक्तींच ऐकून घेऊ शकता, त्या हृदयाच्या वेदना समजून घेऊ शकतात… कुणाचा तरी आधार होता आलं… यापेक्षा दुसर काहीच नाही… एखाद्याचा आधाराचा खांदा होता आलं…. खूप झालं…. आजच्या या शुष्क जगात माणूस प्रेमाचा ओलावा , आपुलकीचा हात, हृदय जपणारी, भावना सांभाळणारी, संवेदना जाणून घेणारी व्यक्ती शोधत असतो… आणि याचीच आज कमी सर्वत्र पाहायला मिळते आहे…. म्हणून तर न सांगता बोलता व्यक्ती निघून जातात…. ऐकणारे कान भेटत नाहीत… जग म्हणजे प्रेमावर, आपुलकीवर जगत… त्याचाच शोध प्रत्येकाला असतो.. कोणी प्रेमाने विचारपूस केली तरी किती भारी वाटत… कोणी सहज म्हणलं काळजी घ्या… आम्ही आहे… तरी मनाला समाधान मिळतं…. हे कुठल्या पैशात नाही मिळत…. शेवटी माणूस आहे माणसाची अपेक्षा करणारच…. समजून घेऊया, प्रेम वाटूया…. कुणाचा तरी ऐकणारा कान… आणि आधाराचा खांदा होऊया… आणि विशेष स्वतःच प्रेम होऊया कारण आपण स्वतःच प्रेम स्वरूप आहोत याचा विसर नको पडायला…

Listening ears…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नरक चतुर्दशी

- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…

7 hours ago

दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा!

- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्‍या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…

7 hours ago

’स्वीकृत’च्या निवडणुकीतील फुसका फटका

- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…

7 hours ago

बायबाय ‘सीआर सेव्हन’!

- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…

8 hours ago

माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…

8 hours ago

गुलाबी थंडीची चाहूल, पारा 15 अंशांपर्यंत घसरला

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरात दिवाळीच्या दरम्यान थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली आहे. शनिवारी (दि.7)…

8 hours ago