नाशिक

माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय

नाशिक : प्रतिनिधी
दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या आशांचा सण! मात्र, याच दिवाळीत एका कुटुंबाच्या आयुष्यात दुःखाचा काळोख पसरला. ज्या हातात हात घालून आयुष्याची स्वप्ने रंगवली, तोच जीवनसाथी अचानक काळाच्या पडद्याआड गेला. पण या असह्य दुःखाच्या क्षणीही माणुसकीचा दिवा विझू न देता नांदूरमधमेश्वर येथील माळी कुटुंबाने घेतलेला अवयवदानाचा निर्णय अनेकांच्या आयुष्यात नव्या आशेचा प्रकाश घेऊन आला.
नांदूरमध्यमेश्वर येथील शेतमजूर कुटुंबातील रावसाहेब माळी या तरुणाचा रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मेंदूमृत झाला. एका क्षणात संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले. पतीला गमावण्याचे दुःख सहन करणार्‍या पत्नीसमोर आणि आपल्या मुलाला गमावलेल्या आई-वडिलांसमोर आयुष्यातील सर्वांत कठीण प्रसंग उभा होता. मात्र, या दुःखाच्या डोंगराखालीही त्यांनी माणुसकीचा हात सोडला नाही.
नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रावसाहेब यांना पुढील उपचारासाठी आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र दुर्दैवाने त्यांचा मेंदूमृत झाल्याचे घोषित करण्यात आले. या कठीणप्रसंगी अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले. पत्नी मीना माळी, आई-वडील आणि नातेवाईकांनी अवयवदानास संमती दिली. हा केवळ एक निर्णय नव्हता, तर स्वतःच्या दुःखापलीकडे जाऊन दुसर्‍याच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचा विलक्षण त्याग होता.
या संपूर्ण प्रक्रियेत मविप्र रुग्णालयातील डॉक्टर, सहायक कर्मचार्‍यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अवयवांचे वेळेत संकलन आणि सुरक्षित वाहतूक होण्यासाठी पोलिस प्रशासन तसेच विमानतळ प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, पदाधिकारी, संचालक, डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे आणि अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

अनेकांना मिळणार नवजीवन!
हृदय- एअर कॉरिडॉरद्वारे मुंबई येथील एच. एन. रुग्णालयात रवाना.
यकृत- पुणे येथे प्रत्यारोपणासाठी रवाना.
एक मूत्रपिंड- मविप्र रुग्णालय, आडगाव येथे.
दुसरे मूत्रपिंड- नाइन पर्ल हॉस्पिटल, नाशिक येथे.
नेत्र- मविप्र रुग्णालय, आडगाव येथे.
त्वचा- नेहेते रुग्णालय, नाशिक येथे दान.

माझ्या आयुष्यात या दिवाळीत अंधार आला आहे, पण माझ्या पतीच्या अवयवांमुळे इतरांच्या आयुष्यात प्रकाश पडणार असेल, तर त्यापेक्षा मोठे समाधान कोणते? माझ्या पतीच्या शरीराची माती किंवा राख करण्यापेक्षा त्याच्या अवयवांमुळे कुणाला तरी नवे जीवन मिळावे, हीच माझी इच्छा आहे!
– मीना माळी, दिवंगत रावसाहेब माळी यांच्या पत्नी

रावसाहेब माळी यांचा अपघातात मेंदूमृत झाला. एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांच्या पत्नी, आई-वडील आणि नातेवाइकांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय अत्यंत समाजोपयोगी, प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे.
– अ‍ॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

The Mali family lit a lamp of humanity amidst the darkness of grief.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐकणारे कान…

- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्‍या जगात...कोरड्या…

7 hours ago

नरक चतुर्दशी

- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…

7 hours ago

दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा!

- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्‍या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…

7 hours ago

’स्वीकृत’च्या निवडणुकीतील फुसका फटका

- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…

8 hours ago

बायबाय ‘सीआर सेव्हन’!

- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…

8 hours ago

गुलाबी थंडीची चाहूल, पारा 15 अंशांपर्यंत घसरला

नाशिक : प्रतिनिधी नाशिक शहरात दिवाळीच्या दरम्यान थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली आहे. शनिवारी (दि.7)…

8 hours ago