नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात दिवाळीच्या दरम्यान थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली आहे. शनिवारी (दि.7) तापमानाचा पारा 15 अंशांपर्यंत खाली घसरला. सकाळी थंडीचा अनुभव येत असल्याने नागरिकांनी स्वेटरसह गरम कपड्यांचा वापर वाढविला आहे.
शहरात काही दिवसांपासून सातत्याने घसरणार्या पार्यामुळे थंडीचा जोर वाढला आहे.
1 नोव्हेंबरला 21.7 अंश सेल्सिअसवर असणारा किमान पारा दि. 7 नोव्हेंबरला 15.0 अंशांवर आला आहे. ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळल्याने सहा दिवसांत किमान तापमानात 7 अंशांनी घट झाली आहे. नाशिककर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. दि. 2 नोव्हेंबरला किमान तापमान 22.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान पारा 18 अंंच्याजवळ होता. मात्र,
6 नोव्हेंबरला 17.3 आणि शनिवारी (दि. 7) 15.0 अंशांपर्यंत तापमान खाली आला अन् थंडी वाढली आहे.उत्तर भारताकडून येणार्या गार वार्यांचा प्रभाव वाढल्यामुळे थंडी वाढत आहे.
दरवर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत येणारी थंडी यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली आहे. काल 33 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
उत्तर भारताकडून येणार्या गार वार्यांचा प्रभाव वाढल्यामुळे 48 तासांत किमान तापमान 14.5 ते 15.5 अंशांच्या दरम्यान राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळी धुके, हवेत गारवा राहील. दुपारी ऊन असले, तरी वार्यामुळे उकाडा जाणवणार नाही.
– माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
The onset of a pleasant chill; the mercury has dropped to 15 degrees.
- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्या जगात...कोरड्या…
- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…
- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…
- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…
- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…
पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…