महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे

सातारा गॅझेटसाठी एक महिन्याची मुदत

जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अवघ्या 15 तासांत आपले उपोषण मागे घेतले आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते जलप्राशन करून त्यांनी आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणासंदर्भातील सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी हे उपोषण सोडल्याचे समजते. यामुळे राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील तणावाचे वातावरण निवळण्यास मदत झाली आहे.

दरम्यान, काही मराठेतर बहुजन नेत्यांनी मात्र जरांगे यांच्या झुंडशाहीसमोर सरकार झुकत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा या नेत्यांनी दिला आहे. सरकारी प्रतिनिधी मंडळाने मात्र इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता राज्यातील मराठ्यांचे हित साधले जाईल, असे म्हटले आहे.
मध्यरात्री विखे आणि लाड यांच्या नेतृत्वातील सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील व मराठा अभ्यासकांशी सविस्तर चर्चा करून तोडगा काढला. यात कुणबी नोंदी आणि सगेसोयरे यांच्या प्रमाणपत्रांबाबतच्या बहुतांश मागण्यांवर सरकार आणि जरांगे यांच्यात सहमती झाली. मात्र, सातारा गॅझेट या अत्यंत कळीच्या आणि महत्त्वाच्या मागणीवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एका महिन्याची मुदत दिली आहे. या दिलेल्या मुदतीत सरकारने योग्य तो निर्णय न घेतल्यास पुढील भूमिका ठरवली जाईल, असे संकेत यातून मिळाले आहेत. दरम्यान, राज्य सरकार या विषयावर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णय (जीआर) जारी करणार असल्याची चर्चा आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेत त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, उपोषणामुळे खालावलेल्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.

परळीतील नेत्याचे मोठे षडयंत्र?
दरम्यान, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला, असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी यामागे मोठे षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. परळीतील एका नेत्याला राज्यातील सर्वोच्च नेते पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. जरांगे यांच्या या स्फोटक विधानामुळे मराठा आरक्षणाच्या या मुद्द्याला आता एका नव्या राजकीय संघर्षाची किनार मिळाली असून, या आरोपांचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
मान्य झालेल्या प्रमुख मागण्या
कुणबी नोंदी सापडललेल्यांना शैक्षणिक प्रवेशापूर्वी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश सरकार काढणार जात प्रमाणपत्र वितरणाचा पाठपुरावा करण्यासाठी दोन अधिकारी नेमले जातील. शासनाला सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींची यादी ग्रामपंचायत स्तरावर जाहीर केल्या जाणार. मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीतील उपोषण अवघ्या 15 तासांत मध्यरात्री 1 नंतर मागे. कुणबी प्रमाणपत्रांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य; मात्र सातारा गॅझेट संदर्भातील महत्त्वाच्या मागणीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत. उपोषणानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल. आपल्याला संपवण्याचा कट रचल्याचा जरांगे यांचा दावा; परळीतील नेत्याला बडे नेते पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप.

 

 

Manoj Jarange Patil’s hunger strike ends

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

17 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

17 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

17 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

17 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

17 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

17 hours ago