खड्डेमुक्त रस्त्यांसाठी युद्धपातळीवर मोहीम

अधिकारी, कर्मचारी मैदानात; सर्व विभागांत कामांना वेग

नाशिक : प्रतिनिधी
शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, भूमिगत सेवा, रस्ते आणि इतर विकासकामे सुरू असतानाच सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडण्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिक महानगरपालिकेने शहरातील सर्व विभागांमध्ये खड्डे दुरुस्तीची विशेष मोहीम हाती घेतली असून विभागीय अधिकारी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामांचा आढावा घेत आहेत. महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप हे विविध भागांना भेटी देत नागरिकांच्या सूचना जाणून घेत आहेत. तसेच स्थानिक नगरसेवक, विभागीय अधिकारी आणि संबंधित अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रात भेटी देऊन कामांची पाहणी करत आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या वतीने दिलेल्या सूचना, मागण्या आणि प्राधान्यक्रमांचा आदर राखत आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही केली जात आहे. स्थानिक पातळीवर दिलेल्या सूचना आणि प्राधान्यक्रमानुसार तातडीने दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.कामांची प्रगती तपासून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही व्हावी, या उद्देशाने महापौर हिमगौरी आडके व उपमहापौर विलास शिंदे यांनी गंगापूर रोडवरील खड्डे दुरुस्तीच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सिंहस्थ विकासकामांच्या ठेकेदारामार्फत कोल्ड मिक्स डांबरी साहित्याचा वापर करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना प्रभागातील सर्व खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल आणि रस्ते अधिक सुरक्षित होतील, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्परतेने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पश्चिम, पंचवटी, पूर्व, नवीन नाशिक, सातपूर आणि नाशिक रोड या सर्व विभागांमध्ये कामे सुरू आहेत.

या ठिकाणी रस्ते दुरुस्ती
सर्व विभागांमध्ये एनडीएपटेल रोड, अण्णाभाऊ साठे चौक, पी.एन.टी. कॉलनी, धात्रक फाटाकॅनॉल रोड, निलगिरी बाग परिसर, पखाल रोड, रविशंकर मार्ग, अमृतवर्षा कॉलनी, शिवाजीनगर, कामोद नगर सामनगाव रोड, भोर मळा, पाटोळे मळा, रेवगडे चाळ आणि गायकवाड पंप परिसरात प्रशांत नगर, दामोदर नगर, दुर्गा नगर, उत्तम नगर, योगेश्वर नगर, आंबड, जगताप नगर, भाग्यश्री नगर, विजय नगर, शिवशक्ती नगर आदी भागांमध्ये खड्डे दुरुस्तीची कामे सुरू आहेत.

 

 

War-level campaign for pothole-free roads

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago