नाशिक

दिंडोरीत मराठा समाजाचा तासभर ठिय्या

रास्ता रोको करत पोलीस उपअधीक्षकांना मागण्यांचे निवेदन

दिंडोरी : प्रतिनिधी
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिंडोरी तालुक्यात सकल मराठा समाजातर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. मराठा समाजाने एकत्र येत दिंडोरी येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करत टाळ-मृदंग वाजवत एक तास ठिय्या दिला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनानंतर सकल मराठा समाजातर्फे पोलीस उपअधीक्षक शेळके, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सरपंच गंगाधर निखाडे, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती दत्तू भेरे, रमेश बोरस्ते, सोमनाथ जाधव, कैलास मवाळ, संगम देशमुख, नीलेश पेनमहाले, दीपक धुमणे, रघुनाथ पाटील, राकेश शिंदे, वसंत थेटे, विठ्ठलराव आपसुंदे, सुहास देशमुख, यांसह मराठा समाज मोठ्या संख्येने एकवटला होता. शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

मराठा समाजाच्या विविध समस्या

ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सर्व सगेसोयर्‍यांना तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. वेळेवर आरक्षण न मिळाल्याने उच्च गुणवत्ता असूनही मराठा समाजातील तरुण शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय नोकर्‍यांपासून वंचित राहत आहेत. अस्मानी-सुलतानी संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून, आरक्षणाअभावी त्यांच्या पाल्यांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यभरातील मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे बिनशर्त मागे घेण्यात यावेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेला पुरेसा निधी उपलब्ध करून वसतिगृह व शिष्यवृत्तीच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात.

दुतर्फा वाहनांच्या रांगा

सकल मराठा समाज दिंडोरी तालुक्याच्या वतीने जोरदार निदर्शने करत नाशिक-कळवण रस्त्यावर तब्बल एक तास रास्ता रोको करण्यात आला. या अचानक केलेल्या रास्ता रोकोमुळे मुख्य महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. आंदोलकांनी एकजुटीचा नारा देत परिसर दुमदुमून सोडला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून वाहतूक वळवली.

Maratha community stages hour-long sit-in protest in Dindori.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago