नाशिकच्या रघुवीर तांड्यातून निघालेला स्वप्नप्रवास 62 व्या राज्य चित्रपट पुरस्कारांच्या शिखरावर
मनमाड : आमिन शेख
चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात; पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे फार थोडे असतात. नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ असलेल्या रघुवीर तांडा, अनकवाडे या छोट्या आणि उपेक्षित तांड्यात पाहिलेले स्वप्न जेव्हा महाराष्ट्राच्या सर्वोच्च सांस्कृतिक व्यासपीठावर सुवर्णाक्षरांनी कोरले जाते, तेव्हा तो केवळ एका चित्रपटाचा विजय राहत नाही, तर तो एका संपूर्ण समाजाच्या अस्मितेचा आणि संघर्षाचा हुंकार ठरतो. तब्बल 25 वर्षांच्या अथक संघर्षातून साकारलेल्या ‘छबिला’ या मराठी चित्रपटाने 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये पाच मानाचे पुरस्कार पटकावून इतिहास घडवला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल अमृत भालेराव यांचे बालपण याच तांड्याच्या मातीत गेले. लभाण समाजाच्या वाट्याला आलेली उपेक्षा, वंचना आणि दैनंदिन जीवनसंघर्ष त्यांनी जवळून अनुभवला होता. आपल्या समाजाची खरीखुरी व्यथा जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी चित्रपट बनवण्याचे ठरवले. परंतु, या संवेदनशील विषयावर चित्रपट काढण्यासाठी कोणताही मोठा निर्माता पुढे आला नाही. अशा वेळी जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले, तेव्हा तीन भावांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला “जर आपल्या समाजाची व्यथा मांडायला दुसरा कोणी निर्माता मिळत नसेल, तर आपण स्वतःच हा चित्रपट बनवायचा!” आपापल्या जबाबदार्या वाटून घेत तीन भावांनी कर्जाचा डोंगर अंगावर घेऊन चित्रपट निर्मितीच्या प्रवासात झोकून दिले.
अनिल अमृत भालेराव (दिग्दर्शक व लेखक), अजय अमृत भालेराव (निर्माता व सिनेमॅटोग्राफर) व अरुण अमृत भालेराव (अभिनेता, संकलन व प्रोडक्शन) या तिन्ही भावंडांनी विविध जबाबदार्या यशस्वी पार पाडल्या.
राज्य पुरस्कारांच्या या ऐतिहासिक यशाआधीच ‘छबिला’ने देश-विदेशातील प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली
होती.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड आणि अभिनेत्री स्वाती गोतावळे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला आहे. तसेच थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक अनिल अमृत भालेराव यांना ज्युरी स्पेशल/सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. याशिवाय, ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिव्हल, कोलकाता पीपल्स फिल्म
फेस्टिव्हल, यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अहमदाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि चित्रपताका महोत्सवातही सहभाग नोंदवला आहे.
‘छबिला’ ठरला पुरस्काराचा मानकरी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने घोषित झालेल्या 62 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘छबिला’ने आपले वर्चस्व सिद्ध करत खालील पाच प्रमुख सन्मान पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपट (प्रथम), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (प्रथम) – अनिल अमृत भालेराव, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – स्वाती गोतावळे, सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण दिग्दर्शक – अनिल अमृत भालेराव, उत्कृष्ट ध्वनिमुद्रण – सतीश दडस.
दमदार कलाकार व तांत्रिक बाजू
चित्रपटातील कलाकारांच्या वास्तववादी अभिनयामुळे पात्रांना अस्सलपणा मिळाला. यात विनय धाकडे, स्वाती गोतावळे, अरुण अमृत भालेराव, दिलीप डोंबे, राजकिरण कुंभारिकर, देवा पांडे, महेश घुमरे, काजल परदेशी, ईश्वर मोरे, सचिन पाटील, राजश्री पाटील आणि भाग्यश्री पाटील यांनी आपल्या भूमिकांत जीव ओतला. तसेच अविनाश माळी (कला दिग्दर्शन), वृषभ सुतार (संकलन), कैलास भालेराव व विजय सुरेश चव्हाण (प्रोडक्शन) यांच्या तांत्रिक योगदानामुळे चित्रपट अधिक समृद्ध झाला.
The determination of three brothers and ‘Chhabila’s’ historic golden moment!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…