इतिहास सांगतो भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषाला प्रथम स्थान दिले गेले. पण इतिहास हे पण सांगतो की, त्या काळात भारतीय संस्कृतीचा पाया रचणारी खरी आधारवड स्त्री होती. आदिमानवाच्या इतिहासापासून तिने तिची उत्तम कामगिरी दाखवली. शेती,पशुपालन, कुशल कारागिरी, कलाकुसर विविध शोध लावण्या सोबत यात मोठा वाटा स्त्रीचाच होता. शेतीच्या सुधारित पद्धतीचे अवलंबन करण्यास स्त्रीने पुढाकार घेतला. कालांतराने लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी यांसारख्या विदुषी इतिहासात होऊन गेल्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर पत्नी ताराबाई यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. मुघल इतिहासकार खाफीखानने वर्णन केले की, ती बुद्धिमान आणि शहाणी होती सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत नवर्याच्या हयातीत तिचा मोठा लौकिक झाला होता.
अहिल्याबाई होळकर यांनी त्यांचे पती खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर इंदूरच्या भोसले घराण्याच्या कारभाराची सूत्रे हाती घेतले. त्या थोर मुत्सद्दी आणि उत्कृष्ट प्रशासक होत्या. यावरून स्त्री ही गतकाळापासूनच सामर्थ्यवान सिद्ध होती तरी तिला त्याकाळी समाजात दुय्यम स्थान होते असे कळते. वेदकालीन संस्कृतीत घराचा प्रमुख हा ’गृहपती’ मानला जात असे. घरातील सारे निर्णय हे त्यावरच अवलंबून असत.
स्त्रीला दुय्यम स्थान दिलेले नाकारता येत नाही. परंतु प्रश्न स्त्रीच्या दुय्यम स्थानावर नसून स्त्री सन्मानाचा आहे. स्त्री ही समाजाचा महत्त्वाचा घटक असताना ती समाजाचा, कुटुंबाचा एक हितचिंतक ठरलेली असूनदेखील तिला तिचा सन्मान अद्ययावत मिळालेला दिसत येत नाही. आजची नारी प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेली असून, ती घरगुती तसेच सामाजिक हिंसाचार यांपासून त्रासलेली आहे.
पुरुषवर्गाने पावलोपावली स्त्री असण्याची जाणीव तिला करून दिली. प्रसंगी तिच्या मानसिक, शारीरिक अवहेलना झाल्या.
स्त्री परावलंबी असली तरी गुलाम नाही. कधी ती कुटुंब, समाजाला आर्थिक सहाय्य करू शकत नसेल तर ती परावलंबी आहे असेही म्हणता येणार नाही. कारण ती जर घर चालवणारी एक गृहिणी असेल तर गृहिणीवर सर्व कुटुंबाच्या गरजा अवलंबून असतात. म्हणून स्त्रीबाबत परावलंबनाची व्याख्या बोथट ठरते. याउलट कुटुंबात उदरनिर्वाह मध्ये तिची मदत आहे हे कळते. तिलाही तिचे स्वतःचे अस्तित्व आहे. हे पुरुष मान्य करत नाही व स्वतःच मोठेपण आयुष्यभर मिरवत तिच्यावर आज्ञांचा भडिमार सोडून पुरुषार्थ गाजवत असतो. अपवाद विचारी समंजस पुरुषवर्ग सोडला तर बाकी अशीच अवस्था बघायला मिळते.
खरा पुरुषार्थ हा समंजसपणात असून, तिला कमीपणा दाखवण्यात नसतो. तिला चार चौघात चुका दाखवून अपमानित करण्यापेक्षा एकांतात चुका सांगून बदल करण्यात मनाचा मोठेपणा लागतो. तिला अबला मानून तिच्यावर हात उचलण्यापेक्षा तिला हवा असलेला आधार देऊन सामर्थ्यशील बनवावं. नात्यांमध्येही एकमेकांत मतभेद असू शकतात. तिलाही तिचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. तिचे विचार ऐकून
स्वतःचे मत मांडून सर्व निर्णय घेतले जावेत.कधी तिच्या विचारांना न ऐकता पुरुष वर्गाकडून तिचे विचार उधळून लावले जातात आणि होणार्या दुष्परिणामांना मात्र सगळे सामोरे जातात.
शिवरायांनी खरा रणसंग्राम गाजवला तो शत्रूपुढे. परंतु हेच रणसंग्राम गाजवणारे शिवराय स्वतःची आई म्हणजे एका स्त्रीपुढे नतमस्तकही होते. प्रत्येक स्त्रीला आई, बहिणीप्रमाणे वागणूक मिळावी, अशी त्यांची विचारसरणी होती. हा खरा पुरुषार्थ संदेश त्यांनी जगाला पटवून दिला.
स्त्रीकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला तर स्त्री ही प्रत्येक घरातील एक चांगली शुभचिंतक आहे. हितचिंतक आहे. घराच्या हितातच ती स्वहित मानत असते. या दृष्टिकोनाने पुरुषांनी तिच्याकडे बघितल्यावर नक्कीच तिचा व्यापक दृष्टिकोन हा पुरुषवर्गाला कळेल. स्त्री समानता म्हणजे आरक्षण नव्हे, तर मनाच्या विचारांनी आणि परिवर्तनाने स्त्री समानता होऊ शकते, हे नक्की!
Masculinity and femininity…
सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…
नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…
पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…
रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…
संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…