नाशिक

ऐंशी कोटी खर्चाचे सीसीटीव्ही पाण्यात

कारवाईसाठी महाआयटीला अहवाल सादर, मनपा आयुक्त खत्रींची माहिती

नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट सिटी कंपनीने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी महाआयटी कंपनीच्या माध्यमातून एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. यासाठी ऐंशी कोटींचा खर्च आला होता. मात्र, सहा वर्षांतच सीसीटीव्ही नादुरुस्त झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या सीसीटीव्ही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाआयटीला दोनदा अहवाल पाठविण्यात आला आहे.
शहरातील विविध भागांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने महाआयटी संस्थेच्या माध्यमातून शहरभर एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे ऐंशी कोटींच्या निधीतून बसविण्यात आले होते. मात्र, हे सर्व कॅमेरे खराब झाल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्त खत्री यांनी दिली. येणार्‍या सिंहस्थात भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यातून सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यापूर्वी 2019 मध्ये हे सीसीटीव्ही शहरात बसविण्यात आले होते. दरम्यान, सिंहस्थासाठी पावणेदोन वर्षांचा कालावधी बाकी राहिला आहे. सिंहस्थात दोन कोटी भाविक शहरात येण्याचा अंदाज असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना उभारण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. याकरिता शहरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे विणले जाणार असून, याद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्याबरोबरच गैरकृत्य रोखण्याकरिता या कॅमेर्‍यांची पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी बीएसएनएल कंपनीकडून ऑप्टिकल फायबर सुविधा भाड्याने घेण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच या प्रकल्पासाठी अडचणी आल्या. दरम्यान, सीसीटीव्ही प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, याबाबतचा अहवाल महाआयटीकडे पाठविला आहे.

CCTV worth Rs 80 crores in water

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago