♦ पीडितेला पाठविले होते व्हिडिओ
♦ आणखी खुलासे होण्याची शक्यता
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक येथे बलात्कारप्रकरणी अटकेत असलेल्या, अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जाणार्या कॅप्टन ऊर्फ अशोक खरात प्रकरणात नवे वळण समोर आले आहे. त्याच्या कार्यालयात काम करणार्या कर्मचार्यामुळेच या प्रकरणाचा भांडाफोड झाल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित कर्मचार्यालाही यापूर्वी एका गुन्ह्यात अडकवण्यात आले असून, त्याला शुक्रवारी (दि. 20) पोलिसांनी अटक केल्याचे समजते.
स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणून संबोधून राजकीय ज्योतिषी म्हणून वावर करणार्या अशोक खरात याला नाशिक गुन्हेशाखेच्या युनिट-1 पथकाने बुधवारी (दि. 18) बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक केली होती. गेल्या सुमारे 25 वर्षांपासून विविध व्यक्तींना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, खरात याच्या कार्यालयात शिपाई म्हणून काम करणार्या नीरज जाधव याने या प्रकरणातील महत्त्वाची माहिती पुढे आणल्याचे समोर आले आहे. त्याच्यावरही पूर्वीचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी त्याची चौकशी करून शुक्रवारी दुपारी अटक केली आहे.तपासादरम्यान खरात यांच्या घरातून दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले असून त्यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते नाशिकमध्ये दाखल झाल्या असून त्यांनी खरात यांची सुमारे दोन तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र बैठक
दरम्यान, या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे नाव चर्चेत आल्याने विविध आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत रूपाली चाकणकर यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पुढील काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…