महाराष्ट्र

उत्पन्नाच्या तुलनेत ‘एसटी’ला दररोज दोन कोटींचा तोटा

परिवहनमंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना

मुंबई : राज्याची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सध्या दररोज एक ते दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा संचित तोटा असलेल्या एसटीला केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून राहणे आता शक्य नाही. या पार्श्वभूमीवर, महामंडळाने डिझेल खरेदीत पारदर्शकता आणून वार्षिक 241 कोटींची बचत साधली आहे. आता उत्पन्नवाढीसाठी व्यावसायिक इंधन विक्री आणि जाहिरात क्षेत्रात आक्रमक पाऊल टाकले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली.
फेब्रुवारी 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात एसटीला सुमारे 750 कोटींंचा तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने ’पर्यायी उत्पन्न स्रोत’ निर्माण करण्याची विशेष योजना आखली आहे.
डिझेल खरेदीच्या निविदा प्रक्रियेत कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ न दिल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. यापूर्वी प्रतिलिटर मिळणारी 2.70 रुपयांची सवलत आता 5.13 रुपयांपर्यंत वाढली आहे.
एसटीला वर्षाकाठी 40 कोटी लिटर डिझेल लागते, ज्यावर सुमारे तीन हजार 400 कोटी रुपये खर्च होतात. नव्या निविदा प्रक्रियेमुळे दरात प्रतिलिटर 2.13 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळाल्याने महामंडळाचे वर्षाला 241 कोटी रुपये वाचणार आहेत. काही कंपन्यांनी या प्रक्रियेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने महामंडळाच्या पारदर्शक भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले, असे सरनाईक यांनी नमूद केले.एसटी आता स्वतः व्यावसायिक इंधन विक्री क्षेत्रात उतरणार आहे.

सौरऊर्जा प्रकल्प राबवणार

बसस्थानकांच्या छतावर सौर प्रकल्प उभारून वीजविक्रीतून 15 कोटींची बचत केली जाणार आहे. चालक-वाहकांच्या ड्यूटी नियोजनात एआयचा वापर करून ओव्हरटाइम खर्चात कपात केली जाईल, जुन्या बसच्या विल्हेवाटीतून अतिरिक्त महसूल मिळवण्याचे नियोजन आहे. एसटीमध्ये आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता आणणे, हे आमचे प्राधान्य आहे. केवळ सरकारी मदतीवर अवलंबून न राहता, स्वावलंबी होऊन एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

ST is losing Rs 2 crores per day compared to its income.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago