अतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन मनुष्यबळाची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गुरुवारी (दि.23) दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी तातडीने आपत्कालीन यंत्रणांचा आढावा घेत विविध पूरग्रस्त व संवेदनशील भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला नागरिकांच्या जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने काम करण्याचे निर्देश दिले.
महापौरांनी अहिल्यादेवी होळकर पूल परिसराला भेट देऊन गोदावरी नदीच्या वाढत्या पाणीपातळीची पाहणी केली. संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता गोदाकाठावरील सर्व संवेदनशील भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल, वैद्यकीय पथके तसेच संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी महापौरांनी नाशिक महानगरपालिकेच्या कमांड कंट्रोल सेंटर येथे भेट देऊन आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेतला. नियंत्रण कक्षामध्ये आतापर्यंत 70 हून अधिक नागरिकांचे आपत्कालीन कॉल प्राप्त झाले असून, प्रत्येक तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. प्राप्त होणारे कॉल तत्काळ संबंधित विभागांकडे पाठवले जात असून, सरासरी 15 मिनिटांच्या प्रतिसाद कालावधीत आवश्यक मदत पुरविण्यात येत आहे. सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, संपूर्ण महानगरपालिका यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सध्याचा हवामानाचा अंदाज आणि सतत सुरू असलेला पाऊस लक्षात घेता शहरात महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस कायम राहिल्यास गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महापौरांनी केले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाहूनगर, मिलिंदनगर, काजी गढी, आठवडे बाजार व गौरी पटांगण परिसरातील धोकादायक ठिकाणी राहणार्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच शहरातील जुने व जीर्ण झालेले वाडे व धोकादायक इमारती परिसरात विशेष आपत्कालीन व्यवस्था तैनात करण्यात आली असून, संबंधित विभागांना देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
रामकुंड परिसरात सध्या विविध विकासकामे सुरू असल्यामुळे तसेच नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नागरिकांनी त्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये, पर्यटन किंवा छायाचित्रणासाठी जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा तसेच प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.
– हिमगौरी आहेर-आडके, महापौर, मनपा
Mayor inspects the Godavari riverbank and reviews the situation.
सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…
तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…
सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…