राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

भारताकडून इराणला वैद्यकीय मदत; इराणने मानले आभार

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, भारताच्या सहृदय नागरिकांचे मनःपूर्वक आभार. या मदतीमागे केवळ मानवता नाही, तर कूटनीतीचाही धागा जोडलेला आहे.
इराणने भारताशी झालेल्या राजनयिक चर्चेत हॉर्मुझमधून भारतीय जहाजांना मुक्त मार्ग देण्याच्या बदल्यात दोन अटी मांडल्या होत्या – एक, भारताने जप्त केलेल्या इराणी जहाजांची सुटका करावी आणि दोन, औषधे व वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करावा. या पार्श्वभूमीवर भारताने वैद्यकीय साहित्य पाठवणे, हे केवळ दयाळूपणाचे नव्हे, तर हॉर्मुझ मार्गावरील वाटाघाटींचाही एक भाग असल्याचे स्पष्ट होते. शिवालिक आणि नंदादेवी या जहाजांना हॉर्मुझमधून सुरक्षित मार्ग मिळणे आणि वैद्यकीय मदत रवाना होणे,.दोन्ही घडामोडी एकाच वेळी घडल्या हा योगायोग नाही.
इराणमधील मानवीय संकट किती तीव्र आहे, हे आकड्यांवरून स्पष्ट होते. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमुळे इराणमध्ये 32 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनी इराणमधील किमान 13 रुग्णालये आणि इतर आरोग्य केंद्रे उद्ध्वस्त केली असून काही वैद्यकीय केंद्रांना स्थलांतर करावे लागले. जागतिक आरोग्य संस्थेचे दुबईतील जागतिक मानवतावादी पुरवठा केंद्र युद्धामुळे ठप्प झाले आहे, त्यामुळे 25 देशांच्या 50 आपत्कालीन वैद्यकीय मागण्या रखडलेल्या आहेत आणि 1.8 कोटी डॉलर किमतीचा वैद्यकीय साठा अडकलेला आहे. अशा परिस्थितीत भारताची थेट मदत इराणसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

भारतीय जहाज ’जग लडकी’ गुजरातमध्ये दाखल

शिवालिक, नंदादेवीनंतर आता ‘जग लाडकी’ जहाजही भारतीय किनारपट्टीवर पोहोचले आहे. स्ट्रेट होर्मुझ या धोकादायक सामुद्रधुनीतून प्रवास करत हे जहाज कच्चे तेल घेऊन गुजरातच्या मुंद्रा पोर्टला दाखल झाले आहे. बुधवारी सकाळी 10.30 वाजता मुंद्रा पोर्टच्या सागरी क्षेत्र एसपीएम येथे जग लाडकी जहाज पोहोचले. हे खोल समुद्रातील ठिकाण असून, तिथून मोठ्या जहाजातून तेल बाहेर काढले जाते. टँकर त्याच्या नियोजित ठिकाणी पोहोचल्यानंतर येथे तैनात असलेल्या तांत्रिक पथकांनी त्यांची सुरक्षा तपासणी पूर्ण केली. यानंतर नियमानुसार समुद्रातील हस्तांतरण पार पाडण्यात आले.

भारताची वैद्यकीय मदत इराणसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

11 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

11 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

11 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

11 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

11 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

12 hours ago