70 हजारांचा मोबाइल रेल्वे प्रवाशाला परत

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे सुरक्षा दलामार्फत प्रवाशांचे गाडीत किंवा रेल्वेस्थानक परिसरात राहून गेलेले साहित्य सुरक्षितपणे परत करण्याच्या ‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत कौतुकास्पद कार्यवाही करण्यात आली.
गेल्या 8 सप्टेंबरला भुसावळ येथील मंडल सुरक्षा नियंत्रण कक्षाकडून माहिती प्राप्त झाली की, अमरावती एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाचा 70 हजारांचा मोबाइल राहून गेला आहे.
माहिती प्राप्त होताच रेल्वे सुरक्षा दलाने नाशिकरोड येथे तैनात प्रधान आरक्षक धीरज बडगुजर यांना कळवले.
त्यांनी तत्परतेने कार्यवाही करून गाडीत राहिलेला प्रवाशाचा मोबाइल ताब्यात घेतला व तो नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात दिला. प्रवासी धनंजय उगले (वय 49, रा. साईनगर, अमरावती) मोबाइल घेण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे उपस्थित झाले. आवश्यक ओळख व कागदपत्रे सादर केल्यानंतर सॅमसंग कंपनीचा मोबाइल त्यांना परत करण्यात आला.

Mobile phone worth ₹70,000 returned to railway passenger

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *