पावसाचा 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
पुणे/मुंबई : प्रतिनिधी
तळकोकणात बरेच दिवस निष्क्रिय राहून नंतर अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर काहीसा रेंगाळलेला मान्सून आता राज्यात पुन्हा एकदा नव्याने सक्रिय झाला आहे. पश्चिमेकडील वारे समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीपर्यंत अधिक मजबूत झाले असून, उत्तर सोमालिया किनारपट्टीलगत कमी दाबाचा जेट प्रवाह सक्रिय झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यातील तब्बल 23 जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मान्सूनच्या या दमदार पुनरागमनामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची सक्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वार्यांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
दुसरीकडे, मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून, बीड, अंबाजोगाई, केज आणि माजलगाव या तालुक्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाचा अंदाज
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईसह काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी वार्यांसह पावसाचा यलो अलर्ट दिला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा विशेष इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरातही जोरदार पावसाची शक्यता असल्याने या भागांना हवामान विभागाने ’यलो अलर्ट’ दिला आहे. घाटाच्या प्रदेशांत पावसाची तीव्रता अधिक राहू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
Monsoon becomes active again in the state.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…